विदर्भ दखल न्यूज
आरमोरी
आरमोरी तालुक्यातील कोजबी ग्रामपंचायत येथे दिनांक 19.. 8 ..2026 बुधवार रोजी 12 वाजे ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती तंटामुक्त समिती कार्यकारिणीचा एक वर्षाचा कालावधी संपुष्टात आल्याने नव्याने चालू वर्षांकरिता ग्रामसभेमध्ये तंटामुक्त समिती नव्याने गठित विषय ठेवण्यात आला होता सदर विषयाला अनुसरून तंटामुक्त समितीची नवीन कार्यकारणी ग्रामसभेमधे गठित करण्यात आली यानंतर कार्यकारिणी मधून अध्यक्षपदाची निवड करण्यात आली अध्यक्ष पदाच्या निवडीमध्ये सर्वानुमते यापूर्वी तंटामुक्ती अध्यक्ष समिती पदी राहिलेले कृपानंदजी सोनटक्के यांची सर्व सदस्य सर्वानुमते ग्रामसभेमध्ये फेर निवड करण्यात आली तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी कृपानंद सोनटक्के यांची निवड झाल्याने त्यांचे पदाधिकारी व गावातील जनतेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या तंटामुक्त समिती अध्यक्षपदी कृपानंद सोनटक्के यांची निवड झाल्याने लोहारा करपडा कोजबी गावातील जनतेकडून मित्र परिवार यांच्याकडून अभिनंदन केले जात आहे.


Post a Comment