विदर्भ दखल न्यूज
आरमोरी
दिनांक 11/8/2026 आरमोरी तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळा डोंगरगाव भुसारी येथे दिनांक 11 ऑगस्ट 2026 रोजी नव्याने शाळा व्यवस्थापन समितीची रचना करण्यात आली या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्षपदी पुन्हा एकदा श्री राजू हिरामण कुत्तरमारे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली तर उपाध्यक्ष म्हणून सर्व दर्शना देवराव ढोरे यांची सुद्धा निवड एकमताने करण्यात आली
सदस्य पदी लोमेस सहारे सचिन कुथे ,लोचन ढोरे ,छाया खरकाटे, प्रकाश ढोरे, ,गौरी मनोज कोल्हे ,शिक्षण तज्ञ म्हणून प्रा.दौलत धोटे तर सदस्य पदी अरुण राऊत , शिक्षक संवर्गातून वामन गेडाम तसेच अल्पसंख्यांक प्रतिनिधी म्हणून प्रवीना रवींद्र कोल्हे आणि विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून निरांजन गोपाल मिसार वर्ग सहावा, कुमारी अनुष्का भुंकेश्वर कुथे वर्ग सातवा यांची सर्वानुमते निवड करण्यात आली
या व्यवस्थापन समितीचे सचिव म्हणून श्री सुनील चरडुके मुख्याध्यापक यांची सुद्धा निवड करण्यात आली या निवडी प्रसंगी डोंगरगाव येथील विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते नवनियुक्त शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. शाळेचा शिक्षणाचा दर्जा आणि शाळा सुधारण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचा मानस नवीन शाळा व्यवस्थापन समितीने ठरविलेला असून येणाऱ्या भविष्यकाळात जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा ही उच्च स्थानावर कशी नेता येईल यासाठी सर्वांनी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही यावेळी सर्व सदस्यांनी दिली
या पालक सभेच्या अध्यक्षस्थानी डोंगरगाव येथील जेष्ठ नागरिक मुरलीधर खरकाटे यांनी अध्यक्षपद भूषविले होते त्यांच्या अध्यक्षतेखाली सदर शाळा व्यवस्थापन समितीची निवड करण्यात आली नवनियुक्त सर्व शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकारी व सदस्यांचे डोंगरगाव वाशीय जनतेने अभिनंदन केले आहे

Post a Comment