डॉ.बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने आदिवासी दिना निमित्त वृक्षारोपण


विदर्भ दखल न्यूज 
प्रतिनिधी 
वैरागड 


वैरागड : आरमोरी तालुक्यातील कोजबी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने जागतिक आदिवासी दिना निमित्त वैरागड येथील ऐतिहासिक भंडारेश्वर देवस्थान परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. 


कोजबी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय संस्था नेहमी सामाजिक कार्य, गरजूंना आर्थिक मदत करणे, वन्य जीव रक्षण करणे आणि सामाजिक बांधिलकी जपण्याचा स्तुत्य उपक्रम राबविण्याचा कार्य करीत असते. याच उद्देशाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय संस्था यांच्या वतीने दि. ९ ऑगस्ट २०२६ रोजी जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून



 पर्यावरण संतुलित ठेवण्यासाठी वैरागड येथील करपडा रोड वरील ऐतिहासिक भंडारेश्वर देवस्थान परिसरात जांब, बाभूळ, सीताफळ आणि विविध प्रकारच्या १० झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. 
वृक्षारोपण संस्थेचे अध्यक्ष दिनेश रामाजी बनकर संस्थेचे सचिव भारत मधुकर कुमरे संचालक दिलीप नाकाडे, 


 कोषाध्यक्ष अश्विनी गोवर्धने, अरविंद बनकर तसेच संस्था सदस्यांनी वृक्षारोपण केले. वृक्षारोपणाला गावातील नागरिक उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments