कसनसूर येथे पहिली शिक्षण परिषद संपन्न. सेवानिवृत्त उच्च श्रेणी मुख्याध्यापक संतोष कावरे यांचा निरोप समारंभ तसेच आजी,माजी केंद्रप्रमखाचा सत्कार

विदर्भ दखल न्यूज 
एटापल्ली - तालुका प्रतिनिधी 


एटापली तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळा कसनसूर येथे पहिली शिक्षण परिषद दिनांक 31- 7 -2026 रोजी पार पडली. प्रथम क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले व महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. श्री संतोष कावरे सर मुख्याध्यापक जिल्हा परिषद केंद्र शाळा कसनसुर यांना सेवानिवृत्ती निमित्त शाल,श्रीफळ,पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला सत्कारमूर्ती म्हणून श्री डॉक्टर प्रभाकर साखरे,श्री शिरीष येरावार, श्री संतोष कावरे, श्री साईनाथ मडावी,श्री दशरथ गावडे,श्री अविनाश बारसागडे या मान्यवरांची उपस्थिती होती. प्रमुख स्वागत अतिथी म्हणून नव्याने केंद्र कसूनसूर केंद्राचे नव नियुक्त केंद्रप्रमुख माननीय श्री दुर्वासजी ठाकरे  यांचे सर्वच मान्यवरांचे हस्ते स्वागत शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी श्री संतोष कावरे सरांच्या जुन्या आठवणींना उजाळा देत दीर्घायुष्य, निरोगी, आनंदी जीवन जगण्यासाठी भरभरून शुभेच्छा दिल्या. श्री कावरे सरांनी "जीवन संगीत त्यास वाहिले छेदूनिया जन्माचे सार्थक झाले "🎼हे गीत गावून उपस्थितांचे मन जिंकून प्रचंड टाळ्या मिळवल्या. गट साधन केंद्र एटापल्ली येथून कार्यक्रमादरम्यान आलेले आगंतूक  किशोर खोब्रागडे ,सूरज उत्तरवार , दिव्यांगांना मुख्य प्रवाहात आणणारे ठाकरे सर,नागमोती सर यांचे शब्दसुमनाने स्वागत श्री शिरीष येरावार यांनी केले . सूरज उत्तरवार यांनी खान अकॅडमी, डॉक्टर जयंत नारळीकर गणित व विज्ञान नोंदणी शाळेची विद्यार्थ्यांची उपस्थिती, विदयानजली  पोर्टल, यु डायस नंबर अद्यावत कसे करावे याबद्दल मार्गदर्शन केले. श्री किशोर खोब्रागडे यांनी एक पेड माँ के नाम 3.0, शाळाबाह्य सर्वेक्षण असाक्षरांचे सर्वेक्षण 2022



 -27,भारत नव साक्षर सर्वेक्षण, रंगोत्सव कार्यक्रम वर्ग तिसरी ते आठवी, DIET मार्फत चे सर्व उपक्रम, शाळा पूर्व मेळावा,विद्या प्रवेश 30 सप्टेंबर पर्यंत घेणे, SMC (शाळा व्यवस्थापन समिती माजी विद्यार्थी संघ, सरळ पोर्टलवर नोंदणी याबद्दल महत्वपूर्ण माहिती दिली. गटशिक्षणाधिकारी श्री ऋषिकेश बुरुडकर  यांनी भ्रमणध्वनीद्वारे श्री कावरे सरांना सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा दिल्या व दीर्घायुष्य आनंदीमय जीवन जगण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे शुभेच्छा दिल्या. श्री राहुल राजकोंडावार यांनी सेतू अभ्यासक्रम अंमलबजावणी मार्गदर्शन व आढावा याबद्दल मत व्यक्त केले.डॉक्टर जयंत नारळीकर गणित विज्ञान अध्ययन समृद्धी कार्यक्रम याबद्दल रोशन कुलसंगे यांनी सखोल विश्लेषण माहिती दिली . विद्यांजली पोर्टल नोंदणी बाबत अविनाश बारसागडे यांनी विचार व्यक्त केले . श्रीकृष्ण उरकुडे  यांनी PAT एप्रिल 2026 विश्लेषण व कृती कार्यक्रम अंमलबजावणी व पुढील पूर्व तयारी विषयी मार्गदर्शन केले. PARAKH सर्वेक्षण 2017  नियोजन व आराखडा यावर श्री शिरीष येरावार यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली. श्री सचिन वाकडे  यांनी PGI विश्लेषण 2026 -27 पूर्वतयारीची मार्गदर्शन केले. स्पर्धा परीक्षा कृती कार्यक्रम आराखडा याबद्दल श्री लहू वेटी यांनी मार्गदर्शन केले. नवनियुक्त केंद्रप्रमुख श्री दुर्वास ठाकरे  यांनी USK, MDM ऍप व पोर्टल,रंगोत्सव,एआय सारथी,रजिस्ट्रेशन,गणवेश एक्सेल शीट, नवसाक्षर,दिक्षा ॲप,ग्रंथालय अंक याबद्दल माहिती दिली. मावळते माजी केंद्रप्रमुख श्री प्रभाकर साखरे  यांना शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन  भावी कार्यासाठी सर्वांच्या वतीने शुभेच्छा देऊन निरोप देण्यात आला .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सचिन वाकडे  यांनी केले तर आभार श्री रंजीत उंदीरवाडे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्या साठी श्री अतुल पालपलीवार , श्री प्रकाश मडावी, श्री संघर्ष गजभे,श्री राणु वाचामी, श्री रोशन कुलसंगे,श्री राजू नरोटे,श्री बाबुराव गोटा व सर्व शिक्षक, मुख्याध्यापक, पालक व कसन्सूर चे विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.

0/Post a Comment/Comments