विदर्भ दखल न्यूज
पुणे
शनिवार दिनांक 23 मे 2026 रोजी बोरमलनाथ मंदिर येथे आयोजित भिमथडी साहित्य संमेलनात संगीतकार श्री शिवराज साने सर यांना प्रशिस्तपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. दौंड तालुक्याचे कार्यशिल आमदार अँड राहुल दादा कुल कार्यक्रमाला उपस्थित होते. साहित्य संमेलनात संगीतकार श्री शिवराज साने आदरणीय श्री सुरज पवार यांच्या हस्ते हे प्रशिस्तपत्र देण्यात आले. संमेलनाचे अध्यक्ष म्हणून जेष्ठ साहित्यिक श्री सुरज पवार यांची निवड करण्यात आली. विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत संमेलन सोहळा पार पडला. श्री शिवराज साने सर यांनी संगीत क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल व
त्यांच्या कार्याचा गुणगौरव या पुरस्काराच्या माध्यमातून करण्यात आला. संमेलनाचे आयोजन जेष्ठ साहित्यिक श्री दशरथ यादव , संदेश सोनवणे , दिपक पवार यांनी केले होते. तसेच सैराट फेम अभिनेता प्रिन्स, प्रा. फ. शिंदे, जेष्ठ कवयित्री सुवर्णा वाघमारे सुप्रसिद्ध कवी प्रा सुरेश वाळेकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ स्वाती बंगळे आभार प्रदर्शन जेष्ठ कवयित्री सौ. सूवर्णा वाघमारे यांनी केले


Post a Comment