चंद्रपूर जिल्ह्यात थरकाप उडवणारी घडली घटना वाघाच्या हल्ल्यात चार महिलांचा मृत्यू


विदर्भ दखल न्यूज 
चंद्रपूर प्रतिनिधी 
चंद्रपूर 


चंद्रपूर जिल्ह्यात थरकाप  उडवणारी घडली घटना वाघाच्या हल्ल्यात चार महिलांचा मृत्यू..
चंद्रपूर जिल्हा अंतर्गत शिंदेवाही तालुक्यात गुंजेवाही जंगल परिसरात तेंदूपाणे संकलन करण्यासाठी गेलेल्या चार महिलावर अचानक जंगलात दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला केला या हल्ल्यात चार महिलांचा जागीच



 मृत्यू झाल्याची थरकाप उडवणारी घटना घडली आहे सदर घटनेने संपूर्ण  जिल्हा हादरला आहे. मात्र स्थानिक जनतेनी वन विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार चंद्रपूर जिल्हा अंतर्गत शिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही जंगल परिसरात दहा ते बारा महिलांचा गोळखा 
 रोजच्या प्रमाणे तेंदू पत्ता संकलन करण्यासाठी जंगलामध्ये गेल्या होत्या तेंदु पत्ता संकलन जमा



 करण्यासाठी गेले असता अचानक जंगलामध्ये दबा धरून बसलेल्या वाघाने महिलांच्या घोळक्यावरती हल्ला चढविला या हल्ल्यांमध्ये वाघाला पाहून  महिला आपला जीव वाचविण्याकरिता सैरावैरा पडू लागल्या मात्र वाघाच्या तावडीत चार महिला सापडल्याने वाघाच्या हल्ल्यात चार महिलांचा जागीच मृत्यू झाला तर इतर महिलांनी प्रसंगावधान दाखवत जीवाच्या आकांताने स्वतःचा जीव वाचवीन्याकरिता कसाबसा बाहेर पडल्या. मृत झालेल्या महिलांमध्ये कडूबाई दादाजी मोहर्ले ,अणुबाई दादाजी मोहुर्ले, सुनीता कौशिक मोहुर्ले ,संगीता संतोष चौधरी आदी महिलांचा समावेश आहे अशी माहिती मिळाली आहे सदर घटनेची माहिती वनविभागाला मिळताच वनविभागाचि टीम घटनास्थळावर दाखल होऊन जंगल परिसरामध्ये शोध मोहीम राबवीत आहे वनविभागाने परिसरामध्ये वाघाचा शोध घेण्याकरिता शोधमोहीम तीव्र केली आहे चार



 महिलावर वाघाने  हल्ला करून चार महिलांचा बळी घेतल्याने परिसरातील गावांमध्ये मोठे भीतीचे वातावरण निर्माण झाले तणाव निर्माण झाला आहे.  
पोटाची खडकी भरण्यासाठी गाव खेड्या पाड्यातील मजूर वर्ग तेंदू पत्ता संकलन करण्यासाठी दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा गेले असता  जंगलात दबा धरून बसलेल्या  वाघाच्या हल्ल्याला बळी पडून  चार महिलाना आपला जीव गमवावा लागल्याने परिसरामध्ये तणावाचे वातावरण असून वनविभागा बद्दल मोठा संताप व्यक्त केला जात आहे वनविभाग वाघाचा बंदोबस्त करण्यात अपयशी ठरत असल्याचे सुद्धा स्थानिक जनतेमधून बोलले जाऊ लागले आहे  वनविभागाने नरभक्षक वाघाचा तातडीने बंदोबस्त करावा अन्यथा परिसरात मोठा जनआंदोलन उभारले जाईल असे सुद्धा स्थानिक जनतेकडून बोलले जात आहे

0/Post a Comment/Comments