विदर्भ दखल न्यूज
नागपुर ब्युरो
नागपुर
नवऱ्याने विकले स्वतःच्या बायकोला पाच जणांना 50000 रुपयात काळजाला हादरवणारी घटना, गुजरात मधील बनारस काटा पालनपूर पोलीस ठाणे हदीमध्ये एका नवऱ्याने आपल्या पत्नीला पैशाच्या खातर पाच जणांना विकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली मिळालेल्या सविस्तर माहिती नुसार गुजरात मधील बनारस काटा पालनपुर पोलीस ठाणे हदीमध्ये काही वर्षांपूर्वी एक विवाहित जोडपे राहत होते या जोडप्याच्या सुखी समाधानाने संसार चालला होता मात्र या जोडप्यातील कर्त्या पुरुषाला काही व्यसन जडल्याचे त्याला पैशाची उणीव भासत होती अशी माहिती मिळाली आहे त्यात तो पुरुष काम करून सुद्धा व्यसनामुळे त्याच्याजवळ पैसा राहत नव्हता आणि अशातच त्याने पैशाकरिता आपल्या स्वतःच्या पत्नीला 50 हजार रुपये मध्ये पाच जणांना विकले आणि आपली पत्नी बेपत्ता असल्याची खोटी तक्रार एक नव्हे तर दोन पोलीस ठाण्यामध्ये दाखल केली. तक्रार दाखल केली असता पोलिसांनी तक्रारीच्या अनुषंगाने सदर तक्रार दोन दोन ठाण्यामध्ये असल्याने . काही तरी वेगळ असल्याचा संशय बळावला आणि पोलिसांनी तपासाची चक्रे गतीने फिरवली अखेर पोलिसांनी पत्नीचा शोध लावला आणि नवऱ्याचे बीग फुटले. पत्नीचा शोध लागताच पत्नीने सर्व आपबिती हकीकत पोलिसासमोर कथन केली तिने सांगितले "की मी बेपत्ता नव्हती माझ्या नवऱ्याने पैशाच्या लालचे पोटी मला पाच जणांना पन्नास हजार रुपयांमध्ये विकले असल्याचे पत्नीने सांगितले आणि तिने हे सुद्धा सांगितले की ज्या पाच जणांना मला माझ्या नवऱ्याने 50000 रुपयांमध्ये मध्ये विकले होते त्या पाच जणांनी माझ्याकडील सोना दाग दागिने सर्व हिसकावून घेऊन माझ्यावरती त्या पाच जणांनी आळीपाळीने माझ्यावर अत्याचार केला यावरून पोलिसांनी पतीला पोलिसी खाक्या दाखवत घटनेचा तपास तीव्र गतीने सुरू केला आहे. समाजामध्ये घटना घडतात कधी वाईट तर कधी चांगल्या परंतु स्वतःच्या पत्नीला पैशाच्या लालचे पोटी रुपयाच्या बदल्यात विकणे कितपत योग्य म्हणावे लागेल समाज विकृती घटना म्हणावे लागेल काळजाला हादरवणारी घटना म्हणावे लागेल.पर स्त्री ही जेव्हा माहेर आई वडील सोडून सासरी नांदायला येते ती फक्त आणि फक्त नवऱ्याच्या विश्वासावरच आणि मग तिच्या अशा पद्धतीने तिचा विश्वासघात करून तिच्या जीवाशी खेळणे एक नालायकपनाच निसंग पनाचे लक्षण. अशा नालायक निसंग नराधमाना फाशी शिवाय दुसरं "काहीच" नको आहे.. अशा नराधमांना फक्त फाशीच असायला पाहिजे आणि फाशी दिली पाहिजे समाजातील स्त्रियांनी अशा घटनाना आळा घालण्यासाठी अशा विकृती बुद्धीच्या नराधमांच्या विरोधात एकजुटीने एकत्र येऊन संघर्ष करणे आजच्या घडीला फार महत्त्वाचे झाले आहे. घटनेचा तपास पोलीस प्रशासन करीत आहे.


Post a Comment