विदर्भ दखल न्यूज
गडचिरोली
गडचिरोली जिल्ह्यातील तापमानाचा पारा 45 अंशावर जिल्ह्यातील जनतेला बसत आहेत उष्णतेच्या झळा जीवाची होते आहे लाई लाई
जिल्ह्यातील नागरिकांना लागली आहे मोठ्या पावसाची प्रतीक्षा
गडचिरोली जिल्ह्यातील दिवसेंदिवस तापमानामध्ये वाढ होत आहे यामुळे उष्णतेच्या झळा दिसत आहेत मानवी जीवनाची उष्णतेच्या लाटेमुळे लाई लाई होत असून मानवी जीवनार उष्णतेचा मोठा परिणाम दिसत आहे काही ठिकाणी अतिउष्णतेमुळे पशुपक्षी सुद्धा दगावले आहेत गुराढोरांची उष्णतेमुळे मोठी मरोमार होताना दिसत आहे शेतकऱ्यांचे कामे सुद्धा विस्कळीत झाले आहेत रात्रीच्या सुमारास सुद्धा उष्णतेच्या लाटा दिसत आहेत गेल्या काही वर्षाच्या तुलनेत यावर्षी तापमाना मध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसत आहे यामुळे जिल्ह्यातील जनतेला मोठा उकाडा जाणवत आहे काही ठिकाणी उष्माघाताचे पेशंट सुद्धा दिसत आहेत प्रशासनाने उष्णतेचा हाय अलर्ट जारी केला असून नागरिकांनी उष्णतेपासून स्वतःचा बचाव करण्याचे जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन केले आहे. जिल्ह्यातील नागरिकांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा लागली आहे जेणेकरून उष्णतेपासून राहत मिळेल .

Post a Comment