विदर्भ दखल न्यूज
वृत्तसंस्था
मुंबई
रस्त्याने धावत्या कारला लागली आग पाच भाविक जिवंत जाळल्याची माहिती मिळालेल्या माहितीनुसार दिल्ली मुंबई मुख्य मार्गाने धावत्या कारला अचानक आग लागल्याने पाच जण जिवंत जळाले आणि चालक गंभीरित्या भाजल्या असल्याची माहिती मिळाली आहे. धावत्या कारमध्ये सर्वजण मध्य प्रदेशातील रहिवासी असल्याची माहिती आहे वैष्णोदेवीचे दर्शन घेऊन जम्मू आणि काश्मीर हून परत येत असताना हा अपघात झाल्याची सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. जखमी चालकाला रुग्णांलयामध्ये दाखल करण्यात आले आहे मात्र त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे वृत्त आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा अपघात मौजपूर जवळील खाम क्रमांक 115/300 जवळ झाला असल्याची माहिती दिली. दिल्लीहून कोठाकडे जाणाऱ्या कारला अचानक आग लागली आणि काही मिनिटातच गाडी संपूर्ण आगीच्या बक्षस्थानी पडली सदर घटना एवढ्या जोराने घडली की गाडीतील लोकांना काही माहीतच नाही पडले. आणि गाडीतून जीव वाचवण्याची संधी सुद्धा मिळाली नाही मृतांमध्ये तीन महिला एक लहान मुल आणि एका पुरुषाचा जळून मृत्यू झाल्याची माहिती आहे कार चालवणारा चालक विनोद कुमार मेहर गाडीतून कसा बसा आपला जीव वाचवण्यात मात्र तो यशस्वी झाला मात्र तो 80% भाजल्या असल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे रस्त्याने ये जा करणाऱ्यांनी लगेच अग्निशमन दलाला माहिती देऊन पोलीस प्रशासन माहिती दिली घटनास्थळी गस्तीपथक आणि रुग्णवाहिका दाखल झाली आहे.


Post a Comment