भुवनेश्वरमधील राष्ट्रीय जिमनॅस्टिक स्पर्धेत ओमकार शिंदेला कास्यपदक


विदर्भ दखल न्यूज 
प्रतिनिधी दिलीप अहिनवे 
मुंबई व ठाणे शहर 



दि. १, भिवंडी (ठाणे) : २५ एप्रिल ते ३ मे या कालावधीत ओरीसा राज्यातील भुवनेश्वर येथे राष्ट्रीय जिमनॅस्टिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. ठाणे जिल्ह्याच्या ओमकार शिंदे या गुणवान खेळाडूने रोमन रिंग्ज प्रकारात नेत्रदीपक कामगिरी करत कास्यपदकाला गवसणी घातली. कठोर मेहनत, जिद्द, चिकाटी आणि सातत्यपूर्ण सरावाच्या जोरावर त्याने हे यश संपादन केले आहे. या यशामुळे ठाणे जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. सर्व स्तरातून ओमकारवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. ही यशस्वी कामगिरी अनेक तरुण खेळाडूंना प्रेरणादायी ठरणारी असून ओमकारच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्वत्र शुभेच्छा दिल्या जात आहेत. भविष्यात तो आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व नक्कीच करेल यात तीळमात्र शंका नाही.

0/Post a Comment/Comments