गणेशपुर शेत शिवारात नाल्यालगत होते अवैध दारूची विक्री, अवैद्य दारू विक्रेत्याला अभय कोणाचे? पोलीस विभाग कारवाई करणार कधी? परिसरातील महिला भगिनींचा प्रसिद्धी पत्रकातून प्रशासनाला सवाल...

गडचिरोली सुपर फास्ट 
 न्युज वृत्तसेवा 
गडचिरोली ब्युरो 



प्रशासनाने गडचिरोली जिल्ह्यामध्ये दारूबंदी केली परंतु ही  दारूबंदी कागदोपत्री  स्पष्ट होत असून 
आरमोरी तालुक्यापासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या सिरसी गणेशपुर परिसरातील शेतशिवारात खुल्या आंमपणे अवैध राजरोसपणे दारू विक्री होते आहे . या अवैध दारू विक्रीला अभय कुनाचे? अशी चर्चा परिसरातील महिला भगिनींच्या तोंडून रंगू लागली आहे. घरातील जबाबदार कुटुंबप्रमुख कमवता माणूस दिवसभर घाम कष्ट काढून दिवसभरातून आलेल्या मिळकतीतून सायंकाळच्या सुमारास दारू ढोसत



 असल्याने परिवाराचे तीन तेरा वाजले आहेत. घरात अठरा विश्व दारिद्र पसरल्याचे दिसत आहे आणि याचा सर्वात जास्त त्रास घरातील महिला भगिनींना होत आहे .परिसरातील गावातील शांतता सुव्यवस्था धोक्यात आल्याचे पाहावयास मिळत आहे काही दारू पिणारे तळीराम दारू पिऊन गावामध्ये येऊन चौकामध्ये अर्वाच्च शब्दात बडबड करत असल्याने याच्या मानसिक त्रास गावातील सुजान नागरिकांना होताना दिसत आहे. मात्र प्रशासनाला अजून पर्यंत याची जाग आली नाही .प्रशासनाला जाग कधी येणार असी सुद्धा जनमानसात चर्चा सुरू आहे .



परिसरातील दारू पिण्यामुळे कित्येक लोकांचे बळी गेले आहेत कित्येक महिला विधवा झाल्या आहेत. या गंभीर बाबीशी प्रशासनाला काही देणे घेणे आहे की नाही हे आता कळेनासे झाले आहे. पोलीस प्रशासनाने दारू विक्री करणाऱ्या विक्रेत्यावर कठोर कारवाई करावी आणि ही दारू विक्री बंद करावी अशी मागणी आता महिला भगिनी कडून जोर धरू लागली आहे .

1/Post a Comment/Comments

Post a Comment