RPI आठवले गटांची जिल्हास्तरीय आढावा बैठक संपन्न ..

विदर्भ दखल न्यूज 
गडचिरोली 


गडचिरोली - इंदिरा गांधी चौकातील स्थानिक विश्राम
गृहामध्ये दिनांक 6/9/2026 रोजी रविवारला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया,( आठवले गट) ची जिल्हा स्तरीय आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते,विदर्भाचे अध्यक्ष, श्री माननीय आगलावे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली.सभेला उपस्थित, वर्धा जिल्हा अध्यक्ष माननीय कांबळे साहेब, मा. मेघराज घुटके साहेब, जिल्हा




 अध्यक्ष ( RPI) आठवले गट, जिल्हा महासचिव मा. पुरुषोत्तम बांबोळे साहेब, ( RPI), मा. वाकडे साहेब, मा. दिनेश बनकर साहेब, मा. सहारे साहेब, आदी मान्यवरांची उपस्थिती होती, या बैठकीमध्ये मा. श्री, आगलावे साहेब बैठकीला मार्गदर्शन करताना म्हणाले की, केंद्रामध्ये आठवले साहेब,सामाजिक न्याय राज्यमंत्री आहेत, मुळात RPI पक्ष बाबासाहेबांचा असल्यामुळे गडचिरोली जिल्ह्यामधे RPI पक्षाला मजबूत करण्यासाठी पक्षाचे संघटन मजबूत करून,पक्षाची विचारधारा घरा घरा पर्यंत पोहचवून पक्ष मजबूत करण्यावर त्यांनी भर दिला आहे, सोबतच समाज कल्याण विभागाच्या ज्या काही योजना आहेत त्या शेवटच्या घटकापर्यंत पोहचवून त्यांचा आर्थिक विकास कसा होईल, यावर सुद्धा त्यांनी भर दिला. आठवले साहेबांच्या विचारातून जनतेच्या हिताची कामे करण्याचे सुद्धा आवाहन त्यांनी केले.
बैठकीचे प्रास्ताविक मेघराज घुटके साहेबांनी केले, आणि आभार प्रदर्शन मा. दिनेश बनकर साहेबांनी केले.
बैठकीला जिल्ह्यातील बाराही तालुक्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments