विदर्भ दखल न्यूज
गडचिरोली
News Journalist Association (NJA) या पत्रकार संघटनेच्या गडचिरोली जिल्हाध्यक्षपदी मंगेश जगेश्वर बन्सोड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष खलील सुर्वे यांच्या नेतृत्वाखालील NJA कडून १० सप्टेंबर २०२६ रोजी जारी करण्यात आलेल्या Letter of Intimation मध्ये बन्सोड यांची Gadchiroli District President म्हणून नामनिर्देशनाची माहिती देण्यात आली आहे.
पत्रानुसार, त्यांची नियुक्ती १ फेब्रुवारी २०२५ पासून पुढील आदेशापर्यंत प्रभावी असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच नियुक्तीची वैधता ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत असल्याचे पत्रात नमूद आहे.
पत्रकारांच्या हितासाठी संघटनेच्या माध्यमातून कार्य करत संघटनेला बळकटी देण्याची अपेक्षा NJA कडून व्यक्त करण्यात आली आहे.
या नियुक्तीबद्दल मंगेश बन्सोड यांचे पत्रकारिता क्षेत्रातील सहकारी, मित्रपरिवार व विविध स्तरांतून अभिनंदन करण्यात येत असून, गडचिरोली जिल्ह्यात पत्रकारांच्या प्रश्नांसाठी ते प्रभावीपणे काम करतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
Ref. No.: NJA/IND/2026/2607
मंगेश जगेश्वर बन्सोड — गडचिरोली जिल्हाध्यक्ष, News Journalist Association (NJA)



Post a Comment