धान्य पिकावर खोडकिडी करपा तुडतुड्याचा प्रादुर्भाव. शेतकऱ्यांची अवस्था बिकट..शेतकऱ्यांना सबसिडीवर कृषी विभागांने कीटकनाशक औषधे पुरवावी. शेतकऱ्यांची प्रशासनाला मागणी..

विदर्भ दखल न्यूज 
दिनेश रामाजी बनकर 
मुख्य संपादक 
गडचिरोली 
7822082216


आरमोरी सध्याच्या घडीला वातावरणामध्ये हवामानामध्ये मोठा बदल झालेला असून जवळपास दहा दिवसापासून उष्णता मोठ्या प्रमाणात वाढली आहे याचा परिणाम जनमानसासोबतच धान्य पिकावर सुद्धा मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे. आरमोरी तालुक्यातील वैरागड, कोजबी,शिरसी, बोरी, वडधा मानापूर ,पिसेवडधा परिसरात धान्य पिकावर




 खोडकिडी करपा तुडतुड्याचा प्रादुर्भाव दिसू लागला आहे यामुळे शेतकऱ्यांच्या समस्यांमध्ये मोठी वाढ झालेली आहे सध्या शेतकरी धान्य पिकावर औषध फवारण्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येत आहेत शेतकऱ्यांना धान्य पिकावर खोड किडी करपा तुडतुडा याचे नियंत्रण करण्याकरिता कृषी विभागाकडून मार्गदर्शनाची गरज आहे यासोबतच शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती बघता त्यांना सबसिडीवर कीटकनाशक औषधे कृषी विभागाने सबसिडीवर पुरविण्या यावे अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे शेतकऱ्यांच्या धान्य पिकावर रोगाने थैमान घातल्याने शेतकऱ्यांची मानसिकता मोठी बिकट झाल्याचे दिसत आहे.शेतकऱ्यांनी होता नव्हता एक एक रुपया पिक लागवडीपासून शेतामध्ये धान्य पिकावर लावलेला आहे सध्याच्या घडीला धान्य पिकांवरील रोगाचे नियंत्रण करण्याकरिता कीटकनाशक घेण्याकरिता शेतकऱ्यांकडे पैसा नसल्याने कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या समस्येची जाण ठेवून आणि आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन शेतकऱ्यांना सबसिडीवर कीटकनाशके पुरवावे अशी मागणी वैरागड, कोजबी, शिरसी ,वडधा , पिसेवडधा ,मानापूर परिसरातील शेतकरी यांनी प्रसिद्धी पत्रकातून कृषी विभागाला केली आहे.

0/Post a Comment/Comments