विदर्भ दखल न्यूज
गडचिरोलि
मुलचेरा : मुलचेरा तालुक्यासह अहेरी उपविभागातील अनेक शेतकऱ्यांनी अग्रीम रक्कम शासनाकडे वेळेत भरणा करून सहा महिन्यांचा कालावधी लोटूनही विद्युत विभागाने शेतकऱ्यांच्या शेतामध्ये सोलर पंप बसवून दिला नसल्याने शेतकरी कामगार पक्षाचे मुलचेरा तालुका चिटणीस भाई चिरंजीव पेंदाम यांनी विद्युत विभागाकडे निवेदन सादर करुन तातडीने सोलर पंप बसवून देण्याची मागणी केली होती. या मागणीची दखल घेत अहेरी उपविभागातील शेतकऱ्यांच्या दारात विद्युत विभागाने तातडीने सोलर पंप चे साहित्य पोहचवून दिले आहे.
मुलचेरा तालुक्यासह अहेरी उपविभागातील शेतकऱ्यांना पाण्याचा आटापिटा सहन करावा लागत होता. त्याची दखल घेत आलापल्ली येथील विद्युत विभागाचे उप कार्यकारी अभियंता यांना मुलचेरा तालुका शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने देण्यात आले होते. तसेच फेब्रुवारी महिन्यात पात्र लाभार्थी शेतकऱ्यांनी आपल्या हिस्साची अग्रीम रक्कम ऑनलाईन पध्दतीने शासनाकडे भरणा केली. मात्र विद्युत विभागाच्या वेळकाढू धोरणामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतात सोलर पंप बसवून दिले नाहीत. यामुळे शेतकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. विद्युत विभागाच्या वतीने तातडीने सदरचे सोलर पंप बसवून दिले नाही तर आलापल्ली येथील विद्युत विभागाच्या कार्यालयासमोर शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शेतकरी कामगार पक्षाचे मुलचेरा तालुका चिटणीस भाई चिरंजीव पेंदाम यांनी दिला होता.
या इशाऱ्याची दखल घेत विद्युत विभागाने तातडीने पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या दारात सोलर पंपचे साहित्य पोहचले असून लवकरच शेतात बसवून दिले जाणार आहेत. शेतकरी कामगार पक्षाचे मुलचेरा तालुका चिटणीस भाई चिरंजीव पेंदाम यांचे लाभार्थी भुरू गंगा पेंडाम, गुरुदास गोविंदा सेडमेक तसेच एट्टापल्ली, चामोर्शी तालुक्यातील लाभार्थ्यांनी आभार व्यक्त केले आहेत.

Post a Comment