विदर्भ दखल न्यूज
गडचिरोली -
प्रा. मुनिश्वर बोरकर
संपादक
कुरखेडा - नवयुवक आदिवासी बिरसा मुंडा वागदरा/रामगड यांच्या वतीने आज दिनांक 9 ऑगस्ट 2026 रोजी जागतिक आदिवासी दिवस व सप्तरंगी ध्वजा चा ध्वजारोहण साजरा करण्यात आले . आमची संस्कृती आमचा अभिमान, मी आदिवासी माझा स्वाभिमान. जागतिक आदिवासी गौरव दिनाच्या सर्व बंधू-भगिनींना हार्दिक शुभेच्छा"वसुंधरेचा ठेवा जपुनी राखू, सृष्टीचा सन्मान, निसर्ग रक्षणासाठी तारक आम्ही आदिवासी म्हणुनी आम्हा आहे अभिमान.
"आदिवासी सुरक्षित तर जंगल सुरक्षित; जंगल सुरक्षित तर पर्यावरण सुरक्षित; पर्यावरण सुरक्षित तर जग सुरक्षित." आपल्या समाजाला आणि आपली परंपरा संस्कृती जोपासून ठेवली आहे.
तरी आदिवासी समाजातील युवक युवती व गावातील ग्रामस्त यांच्या वतीने असीच आपली परंपरा संस्कृती जोपासून ठेवली पाहिजे .
या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या मान्यवर मा. मोरेश्वरजी मडावी साहेब सरपंच ग्रा. . प. रामगड , गणपतजी उसेंडी सर सौ. मंगलाताई दखने पो. पा. वागदरा सौ. रेखाताई दखने पो. पा. जामटोला श्री मंगलसिंगजी मडावी श्री . रातीरामजी उसेंडी श्री. रघुनाथजी मडावी श्री.हिराजी बनसोड श्री. गणेशजी मडावी श्री. प्रवीणजी नैताम साहेब तलाठी श्री. देवरावजी मडावी श्री. समिरजी गावळे श्री. मंगेश नरोटे कार्यक्रमाला उपस्थित होते तसेच मोठ्या संख्येने आदिवासी समाजातील युवक युवती सुद्धा उपस्थित होते

Post a Comment