विदर्भ दखल न्यूज
आरमोरी
आरमोरी : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत राबविण्यात येणाऱ्या P-CBDC योजनेच्या माध्यमातून प्रकल्पातील गावांमधील अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST) तसेच महिला शेतकऱ्यांसाठी तुषार सिंचन (Sprinkler Irrigation) व ठिबक सिंचन (Drip Irrigation) या सूक्ष्म सिंचन घटकांवर 90 टक्के अनुदान उपलब्ध करून देण्यात येत आहे.
या योजनेचा लाभ घेऊन शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये आधुनिक सूक्ष्म सिंचन प्रणालीचा अवलंब करावा, पाण्याचा कार्यक्षम वापर करावा, उत्पादन खर्चात बचत करून पीक उत्पादकता वाढवावी, असे आवाहन श्री. महेश परांजपे, नोडल अधिकारी तथा उपविभागीय कृषी अधिकारी, वडसा तसेच श्री. निलेश गेडाम, तालुका कृषी अधिकारी, आरमोरी यांनी केले आहे.
योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी संबंधित समूह सहायक सहायक कृषी अधिकारी, उप कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी कार्यालयाशी संपर्क साधून आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करावा. प्रकल्पांतर्गत उपलब्ध असलेल्या या विशेष सवलतीचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घेऊन जलसंधारण, पाणी बचत आणि शाश्वत शेतीसाठी योगदान द्यावे, असेही त्यांनी आवाहन केले आहे.


Post a Comment