जिवंत काडतुस बाळगणाऱ्या एका आरोपीला पोलिसांनी केली अटक आणि ठोकल्या बेड्या..


विदर्भ दखल न्यूज
अमरावती


अमरावती
पोलिस ठाण्याच्या हद्दीतील लालखडी परिसरात पिस्तूल व जिवंत काडतूस बाळगणाऱ्या एका तरुणाकाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. आरोपीकडून ३२ हजार रुपये किमतीचे देशी बनावटीचे पिस्तूल व एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. हे पिस्तूल मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यातील शाहापूर येथून आणल्याची माहिती आरोपीने पोलिसांना दिली असून, ते कोणत्या उद्देशाने आणले होते, याचा तपास सुरू आहे. अब्दुल मोहसीन उर्फ सहू अब्दुल रऊफ (२९, रा. बिस्मिल्ला नगर, लालखडी, अमरावती) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पथक नागपुरीगेट पोलिस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना अब्दुल मोहसीन हा लालखडी परिसरात पिस्तूल घेऊन फिरत असल्याची

माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. संशयिताची झडती घेतली असता त्याच्या जवळ लोखंडी पिस्तूल आढळले. पिस्तुलाची मॅगझीन काढून तपासणी केली असता त्यामध्ये एक जिवंत काडतूस भरलेले असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी तत्काळ पिस्तुल व काडतूस जप्त केले.

जप्त मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे ३२ हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणी अब्दुल मोहसीन याच्याविरुद्ध नागपुरीगेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

0/Post a Comment/Comments