विदर्भ दखल न्यूज
मोहोळ,
तालुक्यातील लांबोटी येथे एका मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या द्वितीय वर्षात शिकणाऱ्या २० वर्षीय तरुण विद्यार्थ्याने आपल्या राहत्या घरात अज्ञात कारणाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. सूरज रामचंद्र करे असे या मृत विद्यार्थ्यांचे नाव आहे.
मृत सूरज हा मेकॅनिकल अभियांत्रिकीच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत होता. त्याची
परीक्षा नुकतीच संपल्याने तो दहा दिवसांपूर्वीच आपल्या गावी आला होता. शनिवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास सुरजच्या खोलीचा दरवाजा आतून बंद असल्याचे निदर्शनास आले. घरच्यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता, सूरजने खोलीतील स्लॅबच्या लोखंडी हुकाला काळ्या रंगाच्या दोरीने गळफास घेतल्याचे निदर्शनास येताच. त्यास तात्काळ ग्रामीण रुग्णालय, मोहोळ येथे नेण्यात आले. परंतु उपचारापूर्वीच तो मृत झाला असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. याचे कारण समजू शकले नाही.

Post a Comment