देसाईगंज तालुक्यातील कोंडाळा येथील सिंद्राई रेती घाटावरील मजुराच्या मृत्यूला जबाबदार कोण? आमदार रामदास मसराम यांनी उपस्थित केला विधानसभेत तारांकित प्रश्न... सरकारला धरले धारेवर..


विदर्भ दखल न्यूज 
देसाईगंज 
दिनेश बनकर 
मुख्य संपादक 


कोंढाळा येथील सिंद्राई रेती घाटावर अवैध रेती उत्खनन सुरू असताना झालेल्या अपघातात एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण परिसर हादरला असून, दिवसरात्र सुरू असलेल्या अवैध उत्खननाला नेमके कोणाचे संरक्षण आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

या गंभीर प्रकरणाची दखल घेत आमदार रामदास मसराम यांनी विधानभवनात जोरदार आवाज उठवत सरकारला धारेवर धरले. “अवैध उत्खनन सुरू असताना प्रशासन झोपले होते का? या मृत्यूला जबाबदार असलेल्या घाट मालक, संबंधित अधिकारी आणि अवैध उत्खननाला पाठबळ देणाऱ्यांवर कठोर कारवाई कधी होणार?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.

जनतेच्या जीवाशी खेळणाऱ्या अवैध रेती माफियांना पाठीशी घालणाऱ्यांना अभय देणे थांबवून, या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी ठाम मागणी आमदार रामदास मसराम यांनी केली आहे.

एका निष्पाप जीवाचा बळी जाऊनही प्रशासन जागे होणार नसेल, तर जनतेचा न्याय व्यवस्थेवरील विश्वास कसा टिकणार?

0/Post a Comment/Comments