जिल्हा परिषद शाळा विहीरगाव येथील शिक्षकांचे रिक्त पद तातडीने भरा. विद्यार्थ्यांच्या पालकांनी दिले गटविकास अधिकारी यांना निवेदन. येत्या चार ते पाच दिवसांमध्ये रिक्त पद न भरल्यास शाळेला कुलूप ठोकून शाळेसमोर ठिय्या आंदोलन उभारू पालकांचा प्रशासनाल इशारा..

विदर्भ दखल न्यूज 
आरमोरी 


आरमोरी तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा विहीरगाव येथे इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत शिक्षणाची सोय आहे आणि वर्ग आहेत मात्र गेल्या बऱ्याच दिवसापासून शाळेमध्ये दोनच शिक्षक कार्यरत आहेत या दोन शिक्षकापैकी एक शिक्षक हा नेहमी शासकीय कामांमध्ये गुंतलेला असतो असे पालकांचे



 म्हणणे आहे आणि उरलेला एक शिक्षक एक ते सात वर्गातील मुलांना शिक्षण देण्याकरिता पुरेसा नाही यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षका अभावी अध्यापनाचे परिपूर्ण धडेच होत नसतील तर शाळा कोणत्या कामाची असे म्हणत गावातील पालकांनी



 शाळेतील शिक्षकांची कमतरता पाहून आरमोरील पंचायत समिती गाठली आणि पंचायत समिती मधील गट विकास अधिकारी यांना शाळेतील शिक्षकांचे रिक्त पद भरण्याकरिता निवेदन दिले निवेदनात म्हटले आहे की येत्या चार ते पाच दिवसांमध्ये शाळेतील तातडीने शिक्षकांचे पद न भरल्यास शाळेला कुलूप ठोकून शाळेच्या समोर ठिय्या आंदोलन उभारू असा इशारा पालकांनी प्रशासनाला दिला आहे. 
गट विकास अधिकारी यांना निवेदन देताना अरुण अडबले संदीप मडावी उत्तम चापले पुरोषत्तम सेलोटे एकनाथ सडमाके आदी विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते.
येत्या चार ते पाच दिवसांमध्ये शाळेतील शिक्षकाचे पद प्रशासन भरणार काय? याकडे आता पालक वर्गाचे लक्ष लागून आहे .

0/Post a Comment/Comments