लॉयड्स कंपणीला आपण साथ घ्या जिल्हयाचा विकास नक्कीच. अमृता फडणविस.

विदर्भ दखल न्यूज 
गडचिरोली - मुनिश्वर बोरकर 
संपादक गडचिरोली 


गडचिरोली - एवढ्या मोठा मनाचा बिजनेस मी पहिल्यादाच पाहत आहे. यात प्रभाकरणजी कोरोना काळापासून काम करीत आहेत. उच्च शिक्षण , दवाखाना मी हेडरीला पाहीला आहे. सावित्रीबाई फुलेनी शिक्षणाची ज्योत लावली ती ज्योत लॉयन्सच्या मुली पुढे नेत आहेत. हा विकास महिला सक्षमीकरणाचा आहे याचा मला अभिमान वाटतो.आज गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांच्या सहकार्यामुळे जिल्हयाचा खरा विकास होत आहे. देशाची प्रगती खऱ्या अर्थाने खेळ्यापासुनच होते हेच मिशन घेऊन प्रभाकरण कार्य करीत आहेत. अश्या प्रकारचे मोलाचे मार्गदर्शन अमृता फडणविस यांनी पार पडलेल्या दिक्षात समारंभाप्रसंगी केले.मिशन फार ग्लोबल स्किल्स अँड आंगप्रेन्युअरशिप च्या वतीने बोदली येथे दिक्षात कार्यक्रम मुख्य अतिथी अमृता फडणविस यांचे हस्ते पार पडला.
           सदर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी संचालक बि. प्रभाकरण लोक प्रतिनिधी अरविंद सावकार पोरड्डीवार संचालिका किर्ती रेड्डी , अल्का अरोरा , व्यांकटेशजी आदिची उपस्थिती होती.
आपल्या प्रास्ताविक भाषणातून बि प्रभाकरण यांनी सांगीतले की


लॉयड्स एड मेंटल हि गडचिरोली जिल्हयातील संस्था असुन या संस्थेतुन रोजगार मिळावा म्हणुन या संस्थेद्वारे १० हजार युवक - युवतींना प्रशिक्षण दिले जाते. इथेच शिकायच व रोजगारांसाठी बाहेर पडायच हाच संकल्प घेऊन आजच्या घडीला 300 विध्यार्थी निशुल्क प्रशिक्षण पूर्ण केले असुन पुन्हा ७०० प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण घेत आहेत. हे प्रशिक्षणार्थी उद्याचा सक्षम भारत घडविणार आहेत यात शंकाच नाही असे प्रास्ताविकातून प्रभाकरण यांनी सांगितले.
         राजविद्या निकेतन च्या विघ्यार्थीनीनी झालर नृत्य सादर केले. कार्यक्रमास पोलीसांना चोख बंदोबस्त होता.

0/Post a Comment/Comments