विदर्भ दखल न्यूज
गडचिरोली - मुनिश्वर बोरकर
संपादक
गडचिरोली - गडचिरोली जिल्ह्यातील मतदान केंद्र स्तरिय BLO माहीती गोळा करण्याचे काम सर्व कर्मचार्यांना देण्यात आले त्याचप्रमाणे सदर कामात मदत करण्याकरीता सर्व स्वस्त धान्य दुकानदारांना सुद्धा काम दिले आहे. परंतु BLO चे काम करणाऱ्या कर्मचा-र्यांना शासन मानधान देतो परंतु स्वस्त धान्य दुकानदारांना मानधान मिळत नाही. सकाळी ८ ते ११ पर्यंत स्वस्त धान्य दुकान चालवणे व १२ वाजता पासुन ते ५ वाजेपर्यत B Lo चे कामे करणे पहिलेच कंट्रोल दुकान तुटपुंज्या मानधानावर करावे लागते त्यातही BLo चे दिवशभर काम करून मानधान मिळत नाही तेव्हा शासनाने कंट्रोल दुकानदारांना मानधान देण्यात यावे अशी मागणी स्वस्त धान्य दुकानदार संघटना गडचिरोली चे अध्यक्ष सुरेश बांबोळे व सचिव संजय अलोणे यांनी केलेली आहे.
सदर बाब अशी की . मतदान बाबतचे BLo चे काम करणाऱ्या कर्मचा-र्यांना लढ्ढ पगारही मिळतो वरून मानधान परंतु स्वस्त धान्य दुकानदारांना सेवाभावी काम करायचे आहे असे तहसिलदार सांगतात. पहिलेच कंट्रोल दुकान तुटपुंज्या मानधनावर काम करावे लागते त्यात कुटुंबाचा संसारही चालत नाही आता तर शेतीची कामे सोडून BLo चे कामे करावे लागत आहे.
मुळ कामावर परिणाम -
महत्वाची बाब अशी की स्वस्त धान्य दुकान आता ८ ते ११ पर्यत सुरु राहते आता लाभार्थ्यांना शेतावर रोजी रोटी करण्याकरीता जातात तेव्हा लाभार्थ्यांना वेळे अभावी कंट्रोल सोडवणे कठीण जात आहे. म्हणजे एकीकडे लाभार्थ्यांची नुकसान होत आहे तर दुसरीकडे शासनाने कंट्रोल दुकानदारांना BLO च्या कामाला जुपल्यामुळे कंट्रोल धारकांना सुध्दा मुळ कामावर परिणाम होत आहे तरी कंट्रोल दुकानदाराना BLO चे काम देऊ नये आणि दिलेच तर कंट्रोल दुकानदारांना BLo च्या कामाचे मानधान घ्यावे अशी मागणी जोर धरत आहे. गडचिरोली जिल्ह्यात हिच स्थिती आहे.

Post a Comment