विदर्भ दखल न्यूज
अमरावती दि. (अविनाश गोंडाणे)
अमरावती येथील विदर्भ महारोगी सेवा मंडळ, तपोवन याचे संस्थापक पद्मश्री डॉ. शिवाजीराव पटवर्धन यांनी आजपासून 78 वर्षांपूर्वी कुष्ठरोगी सेवेची बीजे रोवली होती. आज त्याच बीजांचे वटवृक्षात रूपांतर होऊन तपोवन ही संस्था पुन्हा सुसज्ज झाली आहे. या 78 व्या वर्धापन दिनानिमित्त व समाधी स्थलांतरण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
या सोहळ्यासाठी समाजातील विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले होते.
*प्रमुख उपस्थिती*:
प्रमुख मार्गदर्शक पद्मश्री डॉ. रवींद्र कोल्हे व स्मिता कोल्हे, श्री सचिन देव महाराज, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. गोविंद कासट, भारतीय जैन संघटनेचे अध्यक्ष श्री सुदर्शन जी गांग, श्री प्रदीप जी जैन, दैनिक हिंदुस्थानचे श्री विवेक मराठे,प्रयासचे संस्थापक डॉ. अविनाश सावजी, अपेक्षा होमिओ सोसायटीचे अध्यक्ष डॉ. गुंबळे, आधार फाउंडेशनचे अध्यक्ष श्री प्रदीप बाजड, तपोवन संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुभाष गवई इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
*विशेष सन्मान*:
*या सोहळ्यात आधार शहरी बेघर लोकांसाठी निवारा, बडनेरा येथील संचालक श्री. राजीव बसवनाथे व व्यवस्थापिका सौ. ज्योती राठोड यांचा शाल व पुस्तक देऊन गौरव करण्यात आला.*
_____अविनाश गोंडाणे अमरावती 9923264193



Post a Comment