विदर्भ दखल न्यूज
गडचिरोली ब्युरो
मिळालेल्या माहितीनुसार आरमोरी पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे आजाद चौक येथे मोबाईल टावर परिसरामध्ये आरमोरी पोलिसांनी छापा टाकून तीन चार चाकी व एक दुचाकी वाहनातून देशी विदेशी तसेच हातभट्टी मोह दारू मोठ्या प्रमाणात साठा जप्त केला यामध्ये प्रवीण भाऊराव खोब्रागडे राहणार फुले वॉर्ड आरमोरी आणि रुपेश रेकचंद ठवरे राहणार अजय चौक आरमोरी यांना अटक करण्यात आली मात्र एक आरोपी राहुल टेंभुर्णे हा प्रसार झालेला आहे पोलीस त्याच्या मागावर असून त्याचा शोध सुरू असल्याची माहिती मिळाली आहे सदर कारवाई दरम्यान देशी-विदेशी दारूसर चार चाकी दुचाकी वाहन असा एकूण 26 लाख रुपये चा मुद्देमाल पोलीस विभागाने जप्त केला आहे या प्रकरणी अवैध दारू विक्रीच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास आरमोरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कैलास गवते यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक नरेश सहारे करीत आहेत आरमोरी शहरांमध्ये बऱ्याच ठिकाणी खुल्या बिनधास्तपणे दारू विक्री जोमात सुरू आहे ही दारू विक्री कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे आणि याला कोणाचे अभय आहे असा विचारात्मक प्रश्न आरमोरीवासियाना पडला असल्याचे दिसत आहे आरमोरी हे तालुक्याचे ठिकाण असून त्या ठिकाणी शिक्षण आरोग्य आणि मोठी बाजारपेठ आहे तालुक्याचे लगत असलेल्या गावातून लोक कामकाज करण्याकरिता आरमोरी येथे येत असतात आणि या तालुका ठिकाणी दारूचा महापूर असल्याने याचा परिणाम शिक्षण आरोग्य आदी बाबीवर होत असल्याचे दिसत आहे आरमोरी येथील सुजान नागरिकांना सुद्धा या अवैध दारू विक्रीचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.रात्रीच्या सुमारास आरमोरी शहरात मोह फुलाची देशी विदेशी दारू सप्लाय होत असते ही दारू कोणत्या मार्गाने येते हे मात्र कळेनासे झाले आहे रात्री गस्तीवर असणारे असणारे पोलीस विभाग रात्रीच्या सुमारास चेक पोस्ट ड्युटी असताना करतात काय? असे सुद्धा आरमोरी वासियांकडून बोलले जात आहे मात्र सध्याच्या घडीला आरमोरी पोलिसांनी दारू विक्रेत्याच्या विरोधात जी कारवाई केली त्या कारवाईबद्दल पोलिसांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

Post a Comment