विदर्भ दखल न्यूज
गडचिरोली -
मुनिश्वर बोरकर
संपादक
गडचिरोली - रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया शाखा गडचिरोली जिल्हयाचे महासचिव पदी दिनेश बनकर यांची नियुक्ती करण्यात आली. चंद्रपूर येथे पार पडालेल्या रिपाई कार्यकर्त्यांच्या भव्य मेळाव्यात त्यांची आरपीआयचे प्रदेश अध्यक्ष प्रकाशजी कुंभे नागपुर यांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.
दिनेश बनकर आरमोरी तालुक्यातील कोजबी येथील रहिवासी असुन हे गेल्या अनेक वर्षापासुन ते सुपर फॉस्ट पोर्टल चालवित असुन ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास
समाज सेवी संस्थेत समाजसेवक म्हणुन गेल्या अनेक वर्षांपासून कार्य करीत आहेत त्यांनी संस्थेच्या माध्यमातून अनेक गरजू गोर गरीब जनतेची कामे आणि सहकार्य सुद्धा केले आहे.दिनेश बनकर यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून गोर गरीब जनतेला न्याय देण्याचे कार्य केले आहे आणि करीत आहेत सामाजिक क्षेत्रातून त्यांचा जिल्ह्यामध्ये दिवसेंदिवस जनसंपर्क वाढत चाललेला आहे. आरपीआय पक्षात राहून निस्वार्थपणे आजपर्यंत त्यांनी सेवा केली आहे आणि याच कार्याची पावती म्हणुन त्यांची जिल्हा महासचिव पदी नियुक्ती करण्यात आली.
त्यांचा निवडीबद्दल पक्षाचे वरिष्ठ नेते गोपाल रायपुरे शिद्धार्थ सुमन गडचिरोली जिल्हाध्यक्ष प्रा. मुनिश्वर बोरकर उपाध्यक्ष दशरथ साखरे मारोती भैसारे सोनु साखरे सुनिल सहारे लवकुश भैसारे हर्ष साखरे सत्यवान रामटेके जिवन मेश्राम रोशन उके ताराचंद नंदेश्वर धनराज पाझारे ज्ञानेश्वर मुजमकर प्रमोद सरदारे मोरेश्वर राऊत परशराम बांबोळे मोरेश्वर निमगडे नेताजी मेश्राम सुरेश मेश्राम राजु वणकर नाजुक भैसारे मोनेश्वर उंदिरवाडे महिला आघाडी प्रमुख संघमित्रा राजवाडे विशाखा देवतळे लता भैसारे तक्षशिला उंदिरवाडे सुमन उंदिरवाडे सहारे यांनी नियुक्तीबद्दल दिनेश बनकर यांचे अभिनंदन केले आहे.


Post a Comment