विदर्भ दखल न्यूज
गडचिरोली -
मुनिश्वर बोरकर
संपादक गडचिरोली
गडचिरोली - प्रादेशिक परिवहन मंडळ RTO ऑफिस सर्व महाराष्ट्रातील चतुर्थ कर्मचार्यानी आपल्या हक्काच्या मागण्यासाठी दि. १६ जुन पासुन कामबंद आंदोलन संप पुकारला आहे.
- मागण्या -
( । ) प्रादेशिक परिवहन मंडळामधे पदरिक्त असुन पदोन्नती होत नाही त्या पदोन्नती करावी.
( 2 ) नविन आकृतीबंध्द २०२२ पासुन लागु झाले पण आकृतीबंध्द पदानुसार अजुनही पदभरती केली नाही ती करण्यात यावी.
(3) आश्वासित प्रगती योजनेचा लाभ नविन आकृतीबध्दनुसार देत नाही ते देण्यात यावी
( ४ ) वर्ग ४ चे सर्व पदे नष्ट केलेत ती पदभरती सुरु करावी.
आदि मागण्यासाठी चतुर्थ कर्मचाऱ्यांचे लेखणी बंद आंदोलन सुरु असल्यामुळे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय गडचिरोली कार्यालय चतुर्थ कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष हर्षल बदखल सचिव ममता ठाकरे हे सुद्धा लेखणी बंद आंदोलनात सहभागी झाले आहेत. उप प्रादेशिक परिवहन ( RTO ) कार्यालय गडचिरोली ठणठणीत बंद असल्यामुळे
अनेकांचा कामे खोळंबली असुन दुरवरुन येणाऱ्या गाडी मालकांना परत जावे लागत आहे.

Post a Comment