विदर्भ दखल न्यूज
गडचिरोली - मुनिश्वर बोरकर
संपादक गडचिरोली
गडचिरोली - तेलंगणा येथील युवक अहेरी तालुक्यातील मरपल्ली पोलीस स्टेशन हद्दितील करंचा गावांत आपल्या मित्रासोबत गेलाअसता घरमालक व तो सागवन तस्करी करायचे यात पैशाच्या वादातून एकच हात असलेला अपंग घरमालकाने मध्यंरात्री कुऱ्हाडीने सपासप वार करून त्याला ठार केले हि अत्यंत थरारक आणि धक्कादायक हत्याकांड घडल्यामुळे सदर परिसरात एकच खळबळ उडाली.
सविस्तर वृत असे की महेश सत्यणा ओडीला वय २८ वर्ष रा. कर्जी तेलंगणा असे मृत्युकांचे नाव असुन आरोपी लक्ष्मण सोमा आलाम ५५ वर्ष रा. करंचा ता - अहेरी यांचे घरी महेश नेहमीच येत असे कारण हे दोघेही लाकुड तस्करीचा धंदा करायचे दि. १९ जुनला राजेश आपल्या मित्रासोबत लक्ष्मणच्या घरी आला होता जेवणापूर्वी दोघांचे पैशाच्या वादावरून कडाक्याचे भांडण झाले. रात्रौ दोघेही अलग अलग झोपले १२ - १ चे सुमारास रात्रौ लक्ष्मण आलाम यांनी एकाच हाताने कुऱ्हाड घेऊन झेपेत असलेल्या महेश यांचावर सपासप वार केला. त्यामुळे लक्ष्मण तिथेच धारातिर्थ पडला. महेश सोबत असलेला राजेश चापीला त्यांचा मित्र यांचा रिपोर्टनुसार मरपल्ली पोलीस ठाण्याचे ठाणेदार आणि जिमलगट्ठा उपविभागाचे पोलिस अधिकारी राहुल मडावी यांनी घटनेचे गार्भिय लक्षात घेऊन आरोपी लक्ष्मण आलाम यांना ताब्यांत घेऊन मृत्युक महेश यांचा मृत्युदेह शवविच्छेना साठी उपजिल्हा रुग्णालय अहेरी येथे पाठविण्यात आले. या प्रकरणाचा पुढील तपास एसडीपीओ राहुल मडावी यांच्या मार्गदर्शनाखाली मरपल्लीचे प्रभारी अधिकारी आकाश शिंदे करीत आहेत.

Post a Comment