काकरोज जनता पार्टी कडे युवकांचा कल वाढला देशामध्ये परिवर्तन घडवीणार काकरोज जनता पार्टी



विदर्भ दखल न्यूज 
नागपूर ब्युरो 
नागपूर 




काकरोज जनता पार्टी कडे युवकांचा कल वाढला देशामध्ये परिवर्तन घडवीणार काकरोज जनता पार्टी  
 भारत देशात बहुचर्चित   आणि नव्याने सुशिक्षित बेरोजगारांची काकरोज पार्टी म्हणून नव्याने उदयास नावारूपास आलेल्या पार्टीचे संस्थापक शिक्षणाकरिता अमेरिकेमध्ये राहत असलेले महाराष्ट्र राज्यातील रहिवासी अभिजीत दिपके  बाबासाहेबांचे पुस्तक घेऊन दिली विमानतळावर 6..6..2026 शनिवारला. दिल्ली विमानतळावर दाखल झाले त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. हजारोच्या संख्येमध्ये दिल्ली येथील जंतर मंतर स्थानावर. अभिजीत दिपके यांना भेटण्यासाठी युवकांची मोठी उपस्थिती जमली होती. या उपस्तिथाना संबोधित करण्याकरिता अभिजीत जितके दिल्ली येथील जंतर मंतर स्थानावर दाखल  झाले होते. जंतर-मंतर येथील आंदोलन स्थळी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची  मागणी जंतर मंतर येथील आंदोलनातून



 करण्यातआली.महापुरुषांच्या जयघोषाने जंतर-मंतर परिसर संपूर्ण दणाणून गेला होता.दिल्ली येथील पोलिसांचा सुरक्षेच्या कायदा व सुव्यवस्था राखण्याकरिता मोठा फौज फाटा दिल्ली सरकारच्या वतीने लावण्यात आला होता   देशातील युवक आता आपल्या न्याय हक्का करिता संघर्षाच्या पवित्र्यात  असून युवकांना शिक्षण रोजगार आदी प्रश्नावर विकास हवा असून युवक आपल्या न्याय हक्कासाठी काकरोज  जनता पार्टीच्या रूपाने दिली येथील जंतर मंतर वरती आंदोलनात सहभागी झाले होते. काकरोज पार्टी नव्याने उदयासआणि नावारूपास आली असल्याने सुशिक्षित बेरोजगार युवक काकरोज पार्टीकडे मोठ्या उमेदीने अपेक्षेने आणि विकासाच्या प्रवाहाने नव्या उमेदीने बघू लागले आहेत दिवसेंदिवस काकरोज जनता पार्टीकडे  युवकांचा कल वाढत  चालला आहे आणि यामुळे भारत देशामध्ये काकरोज जनता  पार्टी नंबर एकची पार्टी म्हणून 
मोठ्या उमेदीने दिसणार आहे. संपूर्ण भारत देशामध्ये संपूर्ण देशातील राज्यांमध्ये काकरोज पार्टी नावारूपास आली आहे संपूर्ण राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यात काकरोज पार्टीची जिकडे तिकडे चर्चा सुरू आहे. हातामध्ये काकरोज पार्टी फलक घेऊन जिकडे तिकडे काकरोज जनता पार्टीचा युवक वर्ग उदो.उदो करू लागले आहेत  यावरून असे दिसते की येणाऱ्या समोरील काळात काकरोज जनता पार्टी ही युवकांची आधारस्तंभ पार्टी होणार हे मात्र खरे.. काकरोज पार्टीचा उदय झाल्याने मात्र प्रस्थापितांना मोठा घाम फुटू लागल्याचे आता जनतेतून बोलले जाऊ लागले आहे.

0/Post a Comment/Comments