विदर्भ दखल न्यूज
गडचिरोली -
मुनीश्वर बोरकर
संपादक
गडचिरोली
गडचिरोली - ज्येष्ठ समाजसेवक डॉ. शिवनाथजी कुंभारे यांचे दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने सामाजिक, शैक्षणिक आणि जनसेवेच्या क्षेत्राची मोठी हानी झाली.*
*काँग्रेस विधिमंडळ गटनेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या समवेत गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष ॲड. विश्वजीत मारोतराव कोवासे यांनी कुंभारे यांच्या निवासस्थानी जाऊन कुंभारे परिवाराचे सांत्वन करून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली व डॉ. अनंता शिवनाथ कुंभारे यांचेसी संवाद साधला.
यावेळी जिल्हा परिषदचे माजी सदस्य ॲड. रामभाऊ मेश्राम, नगरसेवक रमेश चौधरी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव पंकज गुड्डेवार, अनुसूचित जाती सेलचे जिल्हाध्यक्ष रजनीकांत मोडघरे, परिवहन सेलचे जिल्हाध्यक्ष रुपेश टिकले, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितेश राठोड तसेच काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


Post a Comment