विदर्भ दखल न्यूज
पी. के. सातार
तालुका प्रतिनिधी
चामोर्शी
सोनापूर (ता. चामोर्शी) : समर्पण बहुउद्देशीय संस्था, मुरमाडी यांच्या वतीने स्व. अशोकजी साखरे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ शनिवार, दिनांक 20 जून 2026 रोजी स्मशानभूमी, सोनापूर येथे वृक्षारोपण सोहळा उत्साहात संपन्न झाला.
पर्यावरण संवर्धन व हरित ग्राम संकल्पनेला चालना देण्याच्या उद्देशाने आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. श्री. शेषरावजी कोहळे (उपसरपंच, ग्रा. पं. सोनापूर) होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमती गयाबाई सिडाम (माजी सरपंच, ग्रा. पं. सोनापूर), मा. श्री. उत्तम कोवे (ग्रामपंचायत सदस्य), श्री. सोहनजी माहोरकर (शिक्षक) उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. उपस्थितांनी पर्यावरण संरक्षण, वृक्षसंवर्धन आणि हरित ग्राम निर्मितीचा संकल्प केला. वृक्षांचे महत्त्व सांगत अधिकाधिक वृक्ष लागवड करून त्यांचे संगोपन करण्याचे आवाहन मान्यवरांनी केले.
या प्रसंगी समर्पण बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष श्री. प्रविणजी बोरकर, उपाध्यक्ष श्री. प्रणय साखरे, सचिव श्री. दुर्योधन महावी, श्री. बुधाजी गेडाम, श्री. संतोष कुमरे, श्री. मनोहर हेडाऊ, सौ. ओमलता बोरकर तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी, सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन समर्पण बहुउद्देशीय संस्था, मुरमाडी यांच्या वतीने करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.



Post a Comment