विदर्भ दखल न्यूज
नागपूर ब्युरो
नागपूर
सिंधुदुर्ग, नवराष्ट्र न्यूज नेटवर्क. गेल्या काही महिन्यांपासून उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. अरबी समुद्र, केरळ आणि गोवानंतर नैऋत्य मान्सून कोकणात दाखल झाला आहे. कोकणातील सिंधुदुर्ग आणि कोल्हापुरातील दक्षिण भागात मान्सून आला असून पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये तो राज्यभरात व्यापू शकतो अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मान्सूनच्या पुढील वाटचालीसाठी परिस्थिती अनुकूल असल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, मान्सूनच्या आगमनामुळे मुंबईसह संपूर्ण कोकण पट्टा आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पावसाची तीव्रता वाढण्याचे संकेत आहेत. काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
राज्यातील अनेक भागांना येलो अलर्ट
हवामान विभागाने नाशिक, प रायगड, रत्नागिरी, सिंधु कोल्हापूर, सांगली, सातारा आणि अहमदनगर जिल्ह्यांसाठी पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे. तसेच छत्रपती संभाजीनगर, बीड, बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्येही मेघगर्जनेसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाड्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरींची शक्यता असताना विदर्भातील काही भागांत मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पावसाचा जोर वाढू लागला असून गेल्या दोन-तीन दिवसांपासून राज्यातील वातावरणात मोठा बदल पाहायला मिळत आहे. अनेक भागांत ढगाळ वातावरणासह पावसाच्या सरी कोसळत आहेत. प्रादेशिक हवामान केंद्राने राज्यातील बहुतांश जिल्ह्यांसाठी पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

Post a Comment