जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कोसबी येथे महाराष्ट्र दिन तसेच लहानग्यांचा शाळापूर्व तयारी मेळावा संपन्न*

विदर्भ दखल न्यूज 
गडचिरोली आरमोरी 


       आरमोरी तालुक्यातील शिरशी केंद्र अंतर्गत येत असलेल्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कोसबी येथे *महाराष्ट्र दिन* तसेच शाळेत प्रवेश घेणाऱ्या लहान मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि त्यांच्या पालकांना मार्गदर्शन करण्यासाठी *शाळापूर्व तयारी मेळावा* आयोजित करण्यात आला. सर्वप्रथम सकाळी ठीक 7.30 वाजता शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.



       दिलेल्या नियोजनाप्रमाणे प्रथम वंदेमातरम, ध्वजारोहण, राष्ट्रगीत,राज्यगीत घेण्यात आले त्यांनतर असाक्षर मुक्त गाव शपथ घेण्यात आली.


           ध्वजारोहणानंतर शाळापूर्व तयारी मेळावा आयोजित करण्यात आला.मेळाव्याचा उद्देश मुलांची शाळेसाठी मानसिक, शारीरिक व सामाजिक तयारी करून घेणे, तसेच मुलांना शाळेच्या वातावरणाशी परिचित करणे,
मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक कौशल्ये ओळखणे.
शिक्षणातील नव्या पद्धतींबाबत जागरूकता निर्माण करणे हा होता.




*कार्यक्रमाचे स्वरूप*
                   
          शाळापूर्व तयारी मेळावा कार्यक्रमाच्या उद्घाटनीय सोहळ्याचे उद्घाटक मा. कविता ताडाम सरपंच ग्रामपंचायत कोसबी, अध्यक्ष मा. गुलाब जुमनाके, प्रमुख अतिथी म्हणून विदर्भ दखल न्यूजचे संपादक दिनेश बनकर. विनोद मानकर, मा. प्रमोद रहाटे, मा. प्रकाश चिलबुले, मा.गोवर्धन शेंडे सर आदी उपस्थित होते.


            सदर उपक्रमाच्या निमित्ताने प्रामुख्याने नाव नोंदणी, शारीरिक विकास, सामाजिक व भावनिक विकास, बौद्धिक विकास, भाषिक विकास, गणनपूर्व तयारी, समुपदेशन इत्यादी स्टॉल लावण्यात आले होते .क्षमतेवर आधारित विविध कृती घेऊन कौशल्ये तपासण्यात आली. व मागे असलेल्या बाबींवर मार्गदर्शन करण्यात आले.


       मुलांनी उत्साहाने सर्व उपक्रमात सहभाग घेतला. विविध खेळ आणि सर्जनशील क्रियांमुळे त्यांचा आत्मविश्वास वाढलेला दिसून आला.


      शाळापूर्व तयारी मेळावा अत्यंत यशस्वी ठरला. या उपक्रमामुळे मुलांमध्ये शाळेबद्दलची भीती कमी झाली आणि पालकांनाही योग्य मार्गदर्शन मिळाले.

       महाराष्ट्र दिन तसेच शाळापूर्व तयारी मेळाव्याच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व शिक्षक, पालक आणि शाळेतील विद्यार्थी यांचे विशेष सहकार्य लाभले.


           कार्यक्रमाचे प्रास्ताविक चिलबुले सर मुख्याध्यापक, संचालन ठेंगरे सर,आभारप्रदर्शन आखाडे मॅडम यांनी मानले 

0/Post a Comment/Comments