समाजाचा विरोध करणाऱ्या इसमावर कठोर कारवाई. करण्याची समाज बांधवाची मागणी...

विदर्भ दखल न्यूज
आरमोरी वैरागड


वैरागड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वॉर्ड (मोठा मोहल्ला) येथे असलेला एक इसम आपल्याच समाजाचे इतर समाजात बदनामी करीत असल्याने अख्ख्या समाजाने त्याच्यावर कारवाई करण्याचे मागणी आरमोरी पोलिस ठाण्यात केली आहे.



बाबुराव रायभान भैसारे वय ६० वर्षे वैरागड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर येथील रहिवासी असून हल्ली मुक्काम गडचिरोली येथे राहत असून आपल्या नातेवाईकांना भेटण्यास नेहमी येत असतो. वैरागड येथे आल्या नंतर आपल्या समाजात आणि इतर समाजात आपल्याच समाज विरोधात बदनामी नेहमी करीत



असतो. दि. ४ मे २०२६ रोजी संध्याकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर वार्डात रहिवासी असलेला आंध्रा भानारकर यांच्यासोबत वाद झाला या त्याने समाजाविरोधात अवाच्य शब्दात शिवी गाळी केली. याबाबत आंबेडकर वार्डातील महिला पुरुषांनी बुद्ध विहार समोर सभा घेऊन सामंजस्याने याबाबत विचारणा केली असता सभेत आपल्याच समाज विरोधात शिवी गाळी करून समाज विरोधात अवाच्य शब्दात बोलले असता समाजाने बाबुराव भैसारे यांच्या विरोधात आरमोरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल




करण्याचे निर्णय घेऊन दि. ४ मे च्या मध्यरात्री बौद्ध समाज एकवटून संपूर्ण समाज बांधवांनी तीन ट्रॅक्टरच्या सहाय्याने आरमोरी पोलिस स्टेशन गाठून बाबुराव भैसारे यांच्या विरोधात तक्रार दाखल करून कडक कार्यवाहीची मागणी केली.
तक्रार दाखल होताच समाज विरोधक बाबुराव भैसारे यांना आरमोरी पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली. पुढील तपास पोलिस निरीक्षक कैलास गवते यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रताप लामतुरे करीत आहे.

0/Post a Comment/Comments