डॉ. बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय सामाजिक संस्था कोजबीच्या वतीने पक्षाकरिता करण्यात आली पाण्याची सोय



विदर्भ दखल न्यूज 
आरमोरी 


डॉ. बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय सामाजिक संस्था कोजबीच्या वतीने पक्षाकरिता करण्यात आली पाण्याची सोय .आरमोरी तालुक्यातील कोजबी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष दिनेश बनकर संस्थेचे सचिव भारत कुमरे यांच्या पुढाकारातून गावालगत



 असलेल्या जंगलामध्ये पक्षांकरिता पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली सध्याच्या घडीला उन्हाळ्याचे दिवस सुरू असून तापमानामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झाली आहे आणि जंगला जवळ व जंगलातील



 पाणवठे ओस पडल्याने  पक्षी पाणी पिण्याकरता इकडे तिकडे गाव वस्तीत भटकू लागले आहेत.आणि म्हणूनच पक्ष्यांची पाणी पिण्याकरिता भटकंती पाहून डॉ. बाबासाहेब आंबेडकर संस्थेचे अध्यक्ष दिनेश बनकर संस्थेचे सचिव भारत कुमरे यांच्या पुढाकारातून गावात




 लगत असलेल्या  जंगलामध्ये पक्ष्याकरिता पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे . यावेळी संस्थेच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष दिनेश बनकर सचिव भारत कुमरे



 ,तारुण्य दिनेश बनकर, तृष्याली दिनेश बनकर सानिया बनकर लक्की घुटके रूधिम  वट्टी मित्तान चहांदे आदी शालेय विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले

0/Post a Comment/Comments