*नागपूर येथे १८ मे रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची महत्त्वपूर्ण बैठक आणि ना. रामदास आठवले यांचा सत्कार सोहळा* नागपूर- मेघराज घुटके वि.प्र


विदर्भ दखल न्यूज 
नागपूर-  


रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाची एक अत्यंत महत्त्वाची कार्यकारिणी बैठक आगामी सोमवार, दिनांक १८ मे २०२६ रोजी दुपारी ठीक १:०० वाजता नागपूर येथील रवी भवन येथे आयोजित करण्यात आली आहे. या महत्त्वपूर्ण बैठकीला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री माननीय नामदार रामदासजी आठवले हे स्वतः उपस्थित राहून पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन व संबोधित करणार आहेत. या बैठकीला पश्चिम विदर्भ आणि पूर्व विदर्भातील सर्व जिल्ह्यातील पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन महाराष्ट्र संघटन मंत्री सुधाकर तायडे आणि पूर्व विदर्भ अध्यक्ष विजय आगलावे गडचिरोली जिल्हा प्रमुख मेघराज घुटके यांच्या वतीने करण्यात आले आहे.

याच दिवशी संध्याकाळी मित्र परिवाराच्या वतीने एक विशेष कौतुक सोहळा देखील पार पडणार आहे. नामदार रामदास आठवले यांची नुकतीच राज्यसभेचे सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल, त्यांच्या जाहीर सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा सत्कार समारंभ १८ मे रोजी संध्याकाळी ५:३० वाजता धरमपेठ, व्ही. आय. पी. रोड येथील वसंतराव नाईक स्मृती सभागृह (वनामती) येथे संपन्न होईल.

हा सोहळा कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस कराडचे प्रमुख सल्लागार मा. डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांच्या शुभहस्ते आणि प्राचार्य मा. डॉ. बबनराव तायवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडेल. तसेच, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलसचिव मा. डॉ. पुरण मेश्राम हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. या दोन्ही महत्त्वाच्या कार्यक्रमांना रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी व हितचिंतकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, अशी विनंती संयोजकांनी केली आहे. 

0/Post a Comment/Comments