छत्तीसगडमध्ये नक्षल शोध मोहीम राबविताना माओवाद्यांनी घडवून आणला मोठा स्पोट स्पोटामध्ये एका पोलीस निरीक्षकासह तीन जवान झाले शहीद



विदर्भ दखल न्यूज 
वृत्तसंस्था 
रायपूर 

(फाईल फोटो )
छत्तीसगडमध्ये नक्षल शोध मोहीम राबविताना माओवाद्यांनी घडवून आणला मोठा स्पोट स्पोटामध्ये एका पोलीस निरीक्षकासह  तीन जवान झाले शहीद 
छत्तीसगड राज्यातील गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेला लागून असलेल्या कांकेर जिल्ह्यातीलच छोटा बेटिया पोलीस ठाण्याच्या हदीमध्ये जंगल परिसरात पोलीस विभाग नक्षल शोध मोहीम राबवीत असताना नक्षल्यांनी अचानक मोठा  स्पोट घडवून आणला या स्फोटामध्ये एका पोलीस निरीक्षकासह तीन जवान शहीद झाल्याची माहिती आहे तर एक जवान गंभीर रित्या जखमी झाला असून त्याला रुग्णालयामध्ये उपचाराकरिता दाखल करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे छत्तीसगड राज्यातील कांकेर जिल्हा अंतर्गत येत असलेल्या छोटा बेटिया पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये जंगल परिसरामध्ये काही नक्षल माओवादी लपून बसले असल्याची गोपनीय माहिती पोलीस विभागाला मिळाली त्या माहितीच्या आधारे पोलीस विभागाच्या वतीने जंगल परिसरामध्ये शोधमोहीम राबवीत असताना  नक्षलवाद्यांनी अचानक मोठा आयडी बॉम्ब स्पोट घडवून आणल्याने  अचानक स्फोट झाल्याने पोलीस दलातील एक पोलीस निरीक्षकासह तीन जवानांना वीरमरण आले. लगेच घटनास्थळी शोधमोहीम तीव्र करण्यात आल्याची माहिती आहे. छत्तीसगडचे मुख्यमंत्री यांनी सांगितले की



 डीआरजी जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही त्यांना शासनाच्या वतीने योग्य ती मदत उपचार दिला जाईल आणि त्यांच्या दुःखामध्ये त्यांच्या परिवारासोबत आम्ही ठामपणे उभे आहोत  असे मुख्यमंत्री विष्णू देव यांनी सांगितले आहे स्थानिक पत्रकारांनी काही आपली मते व्यक्त केली आहे जवानांचे हे सर्वोच्च बलिदान असून त्यांचे वीरमरण हे अत्यंत वेदनादायी आहे माओवाद्यांचा नक्षलवाद्यांच्या समूळ पने नाई नाट करण्यासाठी शासनाने कटोरातील कठोर पावले उचलावी असे काही पत्रकारांनि मत व्यक्त केले आहे

0/Post a Comment/Comments