विदर्भ दखल न्यूज
मुंबई
Regional Teacher's Organization यांच्या वतीने शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न करणारे आणि समाजात शिक्षणाची सकारात्मक ज्योत प्रज्वलित करणारे इंडियन एज्युकेशन सोसायटी, नवी मुंबई प्रायमरी School, वाशी येथील प्राथमिक शिक्षक श्री दीपक अशोक चव्हाण यांना “महाराष्ट्र राज्य आदर्श
शिक्षक पुरस्कार २०२६” प्रदान करण्यात येणार आहे.
हा मानाचा पुरस्कार राज्यस्तरीय सन्मान सोहळ्यात प्रदान करण्यात येणार असून, ही बाब शिक्षण क्षेत्रासाठी अत्यंत अभिमानास्पद आहे.
कार्यक्रमाचे ठिकाण
स्थळ: अल्पबचत भवन, कलेक्टर ऑफिस, जळगाव
दिनांक: ३१ मे २०२६
वेळ: सकाळी १० ते सायंकाळी ५
या पुरस्कार निवड प्रक्रियेदरम्यान Regional Teacher's Organization चे महाराष्ट्र स्टेट अॅडव्हायझर प्रदीप सोनवणे सर यांनी श्री दीपक चव्हाण यांची विशेष मुलाखत घेतली होती. त्यांच्या शैक्षणिक कार्याचा आढावा, विद्यार्थ्यांसाठी राबविलेले विविध उपक्रम, नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धती आणि समाजाभिमुख कार्य यांची सविस्तर माहिती या मुलाखतीतून समोर आली. प्रदीप सोनवणे सर यांनी त्यांच्या कार्याचे कौतुक करत शिक्षण क्षेत्रातील योगदान उल्लेखनीय असल्याचे मत व्यक्त केले.
श्री दीपक चव्हाण हे एक कर्तव्यदक्ष, विद्यार्थिप्रिय आणि नवोपक्रमशील प्राथमिक शिक्षक म्हणून ओळखले जातात. त्यांनी अध्यापनामध्ये विविध आधुनिक तंत्रांचा वापर करून विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण केली आहे. विशेषतः विद्यार्थ्यांच्या बौद्धिक, सामाजिक व नैतिक विकासासाठी त्यांनी केलेले प्रयत्न उल्लेखनीय आहेत.
त्यांच्या शैक्षणिक कार्यामध्ये –
नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धती
विद्यार्थीकेंद्रित उपक्रम
डिजिटल शिक्षणाचा प्रभावी वापर
ग्रामीण व शहरी विद्यार्थ्यांमधील शैक्षणिक दरी कमी करण्याचे प्रयत्न
संस्कारक्षम शिक्षणावर भर
विविध स्पर्धा व उपक्रमांचे आयोजन
यांचा विशेष समावेश आहे.
श्री दीपक चव्हाण यांनी केवळ शाळेपुरते मर्यादित न राहता समाजामध्येही शिक्षणाविषयी जागृती निर्माण करण्याचे कार्य केले आहे. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांनी घेतलेली मेहनत आणि समर्पण याची दखल घेत Regional Teacher's Organization यांच्या मार्फत हा सन्मान देण्यात येणार आहे. त्यांना जाहीर झालेल्या सन्मानार्थ पुरस्काराबद्दल मित्र मंडळी शिक्षण क्षेत्रातील गणमान्य आणि थोर मोठ्याकडून त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे


Post a Comment