डॉ .बाबासाहेब आंबेडकर कनिष्ठ महाविद्यालय आरमोरीचा 100 टक्के निकाल..

विदर्भ दखल न्यूज
गडचिरोली
आरमोरी


आरमोरी :- स्थानिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर कनिष्ठ महाविद्यालय यांनी आपली उज्वल यशाची १०० टक्के निकाल राखण्याची परंपरा यावर्षी सुद्धा फेब्रू -२०२६ च्या एच. एस. सी. परीक्षेत कायम ठेवली आहे. परीक्षेला एकूण ७७ विद्यार्थी प्रविष्ट होते , त्यापैकी




 सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण झाले. प्राविण्य श्रेणीमध्ये ४, प्रथम श्रेणीमध्ये १८ ,द्वितीय श्रेणीमध्ये ५० व तृतीय श्रेणीमध्ये ५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यामध्ये शाळेतून प्रथम क्रमांक कु. नैना अतुल नन्नावरे हिला ८१.१७ टक्के , द्वितीय कु. सुनैना भारत शेंडे हिला ७६.५० टक्के , तृतीय वेदांत मुरलीधर देवीकर तथा सुधांशू चक्रधर मेश्राम यांना ७५.३३ टक्के , चतुर्थ कु. पूर्वा विघ्नेश्वर तुपटे हिला ७४.३३ टक्के गुण प्राप्त झाले.
सर्व उत्तीर्ण विद्यार्थांचे संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. मदनजी मेश्राम , सचिव मा.एडवोकेट प्रशांतजी मेश्राम स, प्राचार्या कु. सुदर्शना गेडाम , विभागप्रमुख श्री. एस.एस. झरकर सर , प्रसिद्धी प्रमुख श्री. संदीप गणवीर तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आणि उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या .

0/Post a Comment/Comments