आशा बोऱ्हाडे यांनी नेहमीच वर्गातील अध्यापनाला प्राधान्य दिले* *- मुख्याध्यापिका सुनंदा घनदाट


विदर्भ दखल न्यूज 
*प्रतिनिधी - दिलीप अहिनवे, 
मुंबई व ठाणे शहर*




कुर्ला (मुंबई उपनगर), दि. २५ : कुर्ला 'एल' विभागातील मोरेश्वर पाटणकर मनपा मराठी शाळा सभागृहात प्रशिक्षिका आशा बोऱ्हाडे यांच्या सेवापूर्ती समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या समारंभाला अनेक मान्यवर अधिकारी, प्रशिक्षक, स्पेशल शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, नातेवाईक, आप्तेष्ट व बहुसंख्य पालक उपस्थित होते.
          कार्यक्रमाला पाहुणे म्हणून विभाग निरिक्षिका सुनिता खाडे, विभाग निरीक्षक अतिक शेख, कनिष्ठ पर्यवेक्षक अनिल सनेर, सेवानिवृत्त मुख्याध्यापिका सुनंदा घनदाट, उद्योजक रमेश बोऱ्हाडे व नातेवाईक सुनिल पानसरे हे उपस्थित होते.
           कार्यक्रमाच्या अध्यक्षा सुनंदा घनदाट यांनी सांगितले की, मोरेश्वर पाटणकर मनपा मराठी शाळेच्या इन्चार्ज आशा बोऱ्हाडे यांनी महापालिका शिक्षण विभागात प्रशिक्षिका म्हणून ३४ वर्षे ७ महिने निर्विघ्नपणे सेवा केली. त्यांनी नेहमीच वर्गातील अध्यापनाला प्राधान्य दिले. दोन विषयांत एम. ए. पदवी संपादन केलेल्या त्या एकमेव शिक्षिका आहेत. त्यांना मी काही काम सांगितले की, त्या कधीच नकार देत नव्हत्या. परंतु त्या नम्रपणे उत्तर द्यायच्या की, माझे



 वर्गातील काम पूर्ण झाले की, तुमचे काम करते. त्यांनी कोणत्याही पूरस्कारासाठी कधीही प्रयत्न केले नाहीत. त्यांचे अध्यापन उत्तम होते. त्याचबरोबर त्यांचे प्रशासन देखील सर्वोत्तम होते. त्यांचे अनेक विद्यार्थी विविध ठिकाणी उच्च पदावर कार्यरत आहेत. हाच त्यांना मिळालेला विशेष पूरस्कार आहे. अनेक मान्यवरांनी आपल्या मनोगतातुन आशा बोऱ्हाडे यांच्या सोबतच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. 
          कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सेवानिवृत्त शिक्षक रतन महानुभाव यांनी केले. शेवटी सर्वांचे आभार सत्कारमूर्ती आशा बोऱ्हाडे यांनी मानले.

0/Post a Comment/Comments