विदर्भ दखल न्यूज
गडचिरोली
आरमोरी वैरागड
वैरागड : येथील सती मोहल्ल्यात रहिवासी असलेले वामन राया कुलसंगे यांच्या झोपडीच्या चाफ्यातून २ महिन्याच्या शेळीच्या कोकरावर जीवघेणा हल्ला करून जखमी केल्याची घटना आज दि. २५ एप्रिल २०२६ रोजी पहाटे ३ वाजताच्या दरम्यान घडली.
वैरागड येथील वामन कुलसंगे शेळी पालन करून उदर निर्वाह करीत असतात. आज पहाटेच्या वेळेस वन्य प्राणी बिबट्या शेळीच्या कोकरास तोंडात पकडून पसार होण्याच्या प्रयत्नात असता त्याचा तोंड बाहेर ठेवलेल्या सायकलच्या चाकात अडखळले. आवाज ऐकून कुलसंगे परिवार जागे होऊन आरडा ओरड केली. त्याचवेळेस बिबट्या कोकरास सोडून सायकलच्या चाकात अडखळलेले तोंड काढून पसार झाला. यात बकरीचा कोकरू जखमी झाला आहे.
दि. १८ मार्च २०२६ रोजी रात्री वामन कुलसंगे यांच्या झोपडीच्या खुटास बांधून ठेवलेल्या शेळीच्या कोकरास बिबट्याने ठार केल्याची घटना घडली होती. झोपडीत येणाऱ्या बिबट्याचा बडोबस्त करण्यासाठी वामन कुलसंगे यांनी झोपडी भोवताल जाळ जाळी लावली. तरीही बिबट्या झोपडीत येत असल्याने कुलसंगे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. बिबट्या लोक वस्तीत येत असल्याने वन विभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.


Post a Comment