करपडा चक शेत शिवारात जंगली हत्तीने शिरकाव करून तुडविले धान्याचे उभे पीक शेतकऱ्यांची अतोनात नुकसान जास्तीत जास्त नुकसान भरपाई देण्याची प्रशासनाला शेतकऱ्यांची मागणी

विदर्भ दखल न्यूज 
गडचिरोली 



आरमोरी 
दिनेश रामाजी बनकर 
मुख्य संपादक 7822082216
आरमोरी तालुक्यातील करपडाचक (कोजबी )शेत शिवारामध्ये जंगली हत्तीच्या कडपाने दिनांक 21. 4 .2026 ला मध्यरात्रीचे सुमारास शेतकऱ्यांनी लावलेल्या धान्याच्या उभ्या पिकामध्ये शिरकाव करून पूर्णतः धान्य पीक तुडविल्याने शेतकऱ्यांच्या धान्य पिकांचे अतोनात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे सध्याच्या घडीला धान्य   पीक लोंबीवर आहे आणि अश्यातच दिनांक 21. 4 .2026 रोजी बहुसंख्येने असलेल्या जंगली हत्तीच्या कडपाने शेतामध्ये शिरकाव करून पूर्णतः धान्य पिक तूडविल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे शेतामध्ये असलेले पाईप सुद्धा तूट फूट झाले आहे .(कोसबी ) करपडा शेत शिवारातील महादेव मुल्लेवार, भीमराव मुल्लेवार यांच्यासह बऱ्याचशा शेतकऱ्यांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले



 आहे वनविभागाने सदर नुकसानीचे पंचनामे करून पाहणी करून शेतकऱ्यांना योग्य ती  जास्तीत जास्त भरपाई देण्याची मागणी वनविभागाला शेतकऱ्यांनी केली आहे . नुकसानीच्या ठिकाणी शिरशी वनविभागाचे वनरक्षक वाळके यांनी प्रत्यक्ष  शेतकऱ्यांच्या बांधावर भेट देऊन जंगली हत्ती मुळे झालेल्या धान्य पिकाच्या नुकसानीची  पाहणी केली आणि शेतकऱ्यांना आश्वासित केले की जास्तीत जास्त योग्य ती नुकसान भरपाई शासनाच्या वतीने मिळवून देऊ असे सांगितले आहे. वनविभागाने जंगली हत्तीचा बंदोबस्त लावावा अशी सुद्धा मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

0/Post a Comment/Comments