डॉ. बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय शहरी व ग्रामीण सामाजिक विकास संस्थेच्या वतीने 14 एप्रिल बाबासाहेब यांची जयंती साजरी ..

विदर्भ दखल न्यूज 
गडचिरोली 
आरमोरी 


आरमोरी तालुक्यातील कोजबी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय ग्रामीण व शहरी सामाजिक विकास संस्थेच्या वतीने संस्थेच्या कार्यालयात कोजबी येथे बाबासाहेब आंबेडकर यांची 14 एप्रिल जयंती 14 .4 2026 रोजी साजरी करण्यात आली. जयंतीच्या निमित्याने सर्वप्रथम बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमाला पुष्प माला माला अर्पण करण्यात आले डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास संस्थेचे अध्यक्ष दिनेश बनकर तथा सचिव भारत कुंमरे यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प माला अर्पण करून दीपप्रज्वलन करून माला अर्पण केले . संस्थेच्या कोषाध्यक्ष अध्यक्ष अश्विनी गोवर्धने यांनी




 सुद्धा बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माला अर्पण करून पुष्पहार अर्पण केले यावेळी संस्थेच्या मान्यवरांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या आठवणींना उजाळा देऊन बाबासाहेबांच्या कार्याचा गौरव केला जयंती निमित्याने संस्थेच्या कार्यालयामध्ये मिठाईचे वाटप करण्यात आले .यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय संस्थेचे संचालक गण संस्थेचे अध्यक्ष दिनेश बनकर सचिव भारत कुमरे कोषाध्यक्ष अश्विनी गोवर्धने आदी मान्य मान्यवरांची उपस्थिती होती.

0/Post a Comment/Comments