जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पोर्ला येथे महाराजस्व समाधान शिबिराचे उद्घाटन...

विदर्भ दखल न्यूज 
संपादक मुनिश्चर बोरकर 
गडचिरोली


गडचिरोली - गडचिरोली तालुक्यातील पोर्ला येथे 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे शुभारंभ जिल्हाधिकारी अविष्यांत पंडा यांचे उपस्थितीत पार पडले.
सदर कार्यक्रमास गडचिरोली तहसिलदार सागर कांबळे , गटविकास अधिकारी अनिकेत पाटिल. उपअधिक्षक भुमी अभिलेख कामळे. नायब तहसिलदार चंदु प्रधान पोर्लाचे सरपंच निवृता राऊत उपसरपंच राऊत व गावकरी मंडळी प्रामुख्याने उपस्थित होते.
नागरिकांना शासकीय सेवेचा लाभ एकाच ठिकाणी मिळावा यासाठी महाराजस्व अभियान राबविण्यात येत असुन शासकिय लाभापासुन कोणीही वंचित राहु नये याचा लाभ नागरिकांनी घ्यावा असे जिल्हाधिकारी पंडा यांनी सांगीतले.
उदिष्ठ - महसुल विभागासी संबधित नागरिकांच्या दैनदिन समस्या व तक्रारींचे त्वरीत निराकरण करणे , जमीन महसुल बाबत मार्गदर्शन करणे , महसुल सेवांमध्ये डिजीटल प्रणालीचा जास्तीत जास्त वापर करण्यास प्रोत्साहित करणे व शासनाच्या विविध सुधारित धोरणांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहचविणे आदि उदेश्य ठेवुन मार्गदर्शन करण्यात आले.

0/Post a Comment/Comments