विदर्भ दखल न्यूज
प्रतिनिधी वैरागड
वैरागड : आरमोरी तहसील महसुल मंडळ कार्यालय यांच्या मार्फतीने दि. ७ मार्च रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान (टप्पा) १ अभियान २०२६ अंतर्गत वैरागड महसूल मंडळाच्या आवारात शिबिराचे आयोजन करण्यात आले.
लोकाभिमुख प्रशासन महसूल विभागाच्या सेवा नागरिकांच्या दारी पोहोचवून प्रशासन अधिक गतिमान करणे, लोकाभिमुख प्रशासन महसूल विभागाच्या सेवा नागरिकांच्या दारी पोहोचवून प्रशासन अधिक गतिमान करणे, लोकाभिमुख प्रशासन महसूल विभागाच्या सेवा नागरिकांच्या दारी पोहोचवून प्रशासन अधिक गतिमान करणे या उद्देशाने आरमोरी महसुल मंडळ कार्यालय यांच्या मार्फतीने वैरागड येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान घेण्यात आला. शिबिराचे
उद्दघाटन आरमोरी तहसील कार्यालय नायब तहसीलदार हरिदास दोनाडकर यांच्या हस्ते झाले. अध्यक्ष म्हणून वैरागड ग्रामपंचायत सरपंचा संगीता पेंदाम उपस्थित होत्या. यावेळी आरमोरी नायब तहसीलदार ललित लाडे, नायब तहसीलदार धनराज कुकुडकर, मंडळ कृषी अधिकारी संदीप नाकाडे, आरमोरी पंचायत समिती कृषी विस्तार अधिकारी मोंगरकर, आरमोरी पंचायत समिती कृषी अधिकारी दोनाडकर, आरमोरी पंचायत समिती विस्तार अधिकारी बनपुरकर, प्रकल्प अधिकारी मनोज मडावी, महसूल मंडळ अधिकारी गुरुदास कुंभरे, डॉ. खापर्डे, दुय्यम निबंधक रजिस्टर शोभम गुरदे, माजी जिल्हा परिषद सदस्य केशव गेडाम, उपसरपंच भास्कर बोडणे, ग्रामपंचायत सदस्य आदेश आकरे, रेखा भैसारे उपस्थित होते.
शिबिर दरम्यान प्रलंबित फेरफार ७/१२ मधील चुकांची दुरुस्ती करणे, डिजिटल स्वाक्षरीचे ७/१२ आणि ८-अ उतारा, उत्पन्न, रहिवासी, जातीचे, उत्पन्न प्रमाणपत्र, विद्यार्थ्यांसाठी दाखले, सर्वांसाठी घरे योजने अंतर्गत पट्टे, रेशन कार्ड इत्यादी वाटप करण्यात आले. तसेच नॉन-कीमीलेअर प्रमाणपत्र पी.एम. किसान नोंदणी
अकृषक (एनए) तरतुदीबाबत मार्गदर्शन व सुधारणा करून नवीन व्यवस्थापना नुसार 'सनद' प्रक्रियेची माहिती देण्यात आली. सामाजिक अर्थसहाय्य योजनांचे लाभ मंजूर करण्यात आले. तुकडेबंदी कायद्याच्या उल्लंघना बाबतच्या प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. भूसंपादन व अकृषिक परवानगी प्रकरणी 'कमी-जास्त पत्रके' तयार करून गाव दप्तर अद्यावत करून ई-मोजणी अर्ज निकाली काढण्यात आले.
त्याचप्रमाणे कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना पीएम किसान योजना, महाविस्तार ॲप, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प योजना याबाबत मार्गदर्शन करून राज्य कृषी यांत्रिकीकरण योजना २०२६ अंतर्गत शेतकऱ्यांना ट्रॅक्टर आणि रोटावेटर वितरण करण्यात आले. तसेच आवारात विविध स्टॉल लाऊन योजनेचे माहितीपत्रक देण्यात आले.
शिबिर दरम्यान जिल्हा परिषद कन्या शाळेतील मुलींनी सामूहिक नृत्य सादर केले. तसेच सर्पमैत्रीण प्रवज्जा प्रलय सहारे हिचा शाल, श्रीफळ, प्रशस्तीपत्र आणि सर्पमित्र प्रलय सहारे यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन ठाणेगाव ग्राम महसूल अधिकारी संकेत कात्रटवार यांनी केले.
शिबिर यशस्वितेसाठी वैरागड तलाठी रेणुका करंबे, वैरागड कृषी अधिकारी प्रेमराज मेश्राम, शिरशी येथील ज्योती आत्राम, ठाणेगाव येथील रक्षा कुडमेथे, महसूल सेवक देवेंद्र टेंभुर्णे, प्रियंका गेडाम, दीपक लिंगायत, योगेश कुमरे यांनी मोलाचे सहकार्य केले. यावेळी वैरागड, पाटणवाडा, मेंढेबोडी (चक), हिरापूर (रिठ), ठाणेगाव, चामोर्शी (चक), वासाळा, करपळा (चक), कोजबी, लोहारा, गणेशपुर (चक), शिरशी इत्यादी गावचे शेकडो शेतकरी आणि नागरिक शिबिरात उपस्थित राहून योजनेचा लाभ घेतला.



Post a Comment