जनता विद्यालयाचे एन एम एम एस परीक्षेत सुयश

विदर्भ दखल न्यूज 
बाळकृष्ण उंबरकर तालुका
 प्रतिनिधी नागभीड 

 _
       नागभीड _ येथील स्थानिक जनता विधयालय व कनिष्ठ महाविद्यालय इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजनेत घवघवीत यश संपादन केले आहे या परिक्षेत विद्यालयाचे एकुण १६ विद्यार्थी उतीर्ण झाले असून त्यांची शिष्यवृत्तीसाठी निवड झाली आहे नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांचे चुनुक ओळखुन त्यांना योग्य मार्गदर्शन देऊन विध्यार्थ्यांना विविध परिक्षेसाठी पात्र करण्याचे कार्य जनता विध्यालय नागभीड येथील सर्व शिक्षकवृंदाकडून सतत होत असते आणि याचाच परिणाम म्हणून दरवर्षी प्रमाणे या वर्षीही तालुक्यातून प्राविण्य प्राप्त करून जनता विद्यालयातील दक्ष घुमे,वसुनी शामकुळे,तनवी रंधये, यश खोब्रागडे, सायना खोब्रागडे, आबास वासेकर, श्रावणी नारनवरे, हिमानी रडके, दिशांत सेलोकर, अंश खोब्रागडे, जोया खान, प्रज्वल डांगे, कृष्णा दडमल, प्रियंका खोब्रागडे, तृप्ती दडमल आणि पूर्वी गजभे या विद्यार्थी व विद्यार्थीनीनी आर्थिक दृष्टया दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये आपले नाव उंचावून आपल्या यशाचा झेंडा फडकवला आहे विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री एस टी कोरे ,जनता शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष तथा उपमुख्याध्यापक श्री सी यु रोहणकर सर यांनी यशस्वी विद्यार्थी यांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या

0/Post a Comment/Comments