यादवराव पोशट्टीवार महाविद्यालयात शिवचरित्र व्याख्यान

बाळकृष्ण उंबरकर
 तालुका प्रतिनिधी नागभीड 




_ नागभीड तालुक्यामधील तळोधी येथील यादवराव पोशटटीवार महाविद्यालय येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जिवन कार्यावर व्याख्यान तसेच सन २०२५मध्ये उतीर्ण अंतिम वर्षा च्या विद्यार्थ्यांचा पदवी वितरण समारंभ उत्साहात पार पडला कार्यक्रमाचे आयोजन गोंडवाना विद्यापीठ येथील छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्राच्या सहकार्याने करण्यात आले अध्यक्षस्थानी प्राचार्य श्री डा पी अरुण प्रकाश तर मंचावर गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीचे समन्वयक प्रा विकास चिते, प्रमुख वक्ते डा नत्थु गिरडे, सह वक्ते डा शशिकांत शेंडे, कार्यक्रम समन्वयक प्रा उपेंद्र चिटमलवार उपस्थित होते कार्यक्रमाची सुरवात विद्यापीठ गिताने करण्यात आली प्रमुख वक्ते प्रा डा गिरडे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे वेळेचे व्यवस्थापन कौशल्य या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले डा शशिकांत शेंडे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य आणि पंच परिवर्तन तत्व या विषयावर विचार मांडले संचालन प्रा विवेक मस्के यांनी केले आणि प्रा विलास वानखेडे यांनी आभार मानले या कार्यक्रमास प्राध्यापक, कर्मचारी, व विद्यार्थी उपस्थित होते

0/Post a Comment/Comments