वैरागड परिसरातील रब्बी हंगामातील धान्य पिकावर खोडकिडीचे आक्रमण शेतकऱ्यावर ओढवले मोठे संकट.. प्रशासनाने लक्ष देण्याची गरज

विदर्भ दखल न्यूज 
गडचिरोली 
आरमोरी 


आरमोरी तालुक्यातील वैरागड कोजबी लोहारा शिरशी करपडा परिसरात या वर्षाच्या चालू रब्बी हंगामामध्ये शेतकऱ्यांनी धान्य पिकाची लागवड केली मात्र सुरुवातीपासूनच धान्य पिकावर खोड किडी या रोगाने धान्य पिकावर आक्रमण केल्याने धान्याची फसल होणार की नाही अशी चिंता शेतकऱ्यांना वाटू लागली आहे धान्यपिकांवरती अनेक प्रकारचे विविध कंपनीचे कीटकनाशके मारून सुद्धा खोड किडी रोग



 नियंत्रणामध्ये येत नसल्याने शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढवले असल्याचे दिसत आहे रब्बी हंगामामध्ये शेतकऱ्यांना धान्य पिकाची लागवड करून आतापर्यंत बराच आर्थिक खर्च सुद्धा केलेला आहे मात्र यावर्षी केलेला खर्च सुद्धा धान्य पिकाच्या उत्पन्नातून निघणार की नाही असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे .प्रशासनाने शेतकऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन खोडकिडीच्या नियंत्रणाकरिता योग्य ती फवारणी करिता सल्ला देऊन खोड किडी कशी नियंत्रणामध्ये आणता येईल यासाठी प्रयत्न करावेत असे शेतकरी वर्गातून बोलले जाऊ लागले आहे .

0/Post a Comment/Comments