ओबिसीसह सर्व जातीची जातनिहाय जणगणना करा. भोजराज कान्हेकर.

विदर्भ दखल न्यूज 
प्रा मुनीश्वर बोरकर 
संपादक गडचिरोली 

.
गडचिरोली- सर्व जाती समुह ओबिसींची जातनिहाय जनगणना करण्यात  यावे यासाठी भारत  मुक्ति मोर्चा राष्ट्रीय पिछडा वर्ग ( obc )व सहयोगी आरपीआय च्या वतीने दि. १३ मार्च ला इंदिरा गांधी चौक गडचिरोली येथे धरणे प्रदर्शन करून जिल्हाधिकारी मार्फत राष्ट्रपती - पंतप्रधान व गृहमंत्री यांना निवेदन पाठविण्यात आले. या मागण्या सोबत एस.टी एस. सी. ओबिसी यांच्या समर्थनातील युजीसी बिल लागु करण्यात यावे तसेच २०११ पूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांना टिईटी मधुन मुक्त करावे यासाठी बामसेफ चे जिल्हाध्यक्ष भोजराज कान्हेकर आरपीआयचे जिल्हाध्यक्ष प्रा. मुनिश्वर बोरकर यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले. या प्रंसगी प्रा. मुनिश्वर बोरकर म्हणाले की मा. वामन मेश्राम हे खऱ्या अर्थाने ओबिसी एस.टी च्या



 हक्कासाठी झटणारे एकमेव नेते असुन नागपूर येथील Rss च्या कार्यालयावर लाखो लोकांचा मोर्चा यशस्वी केला.याप्रंसगी ओबिसीचे नेते गुरुदेव भोपये हरिदास कोटरंगे आदिचे समायोचित भाषणे झालीत. सदर आंदोलनाचे अध्यक्ष आरपीआय चे जिल्हाधक्ष प्रा मुनिश्वर बोरकर हे होते. तर प्रमुख मार्गदर्शक म्हणुन बामसेफ चे जिल्हाध्यक्ष भोजराज कान्हेकर होते. कार्यक्रमाचे संचलन प्रमोद राऊत यांनी केले. कार्यक्रमास डोमाजी गेडाम लवकुंश भैसारे शिध्यार्थ भानारकर रोशन उके हेमंत बारसागडे मोरेश्वर निमगडे त्रिभुवन बाळबुद्धे संघमित्रा राजवाडे लता भैसारे लता रामटेके जिवन मेश्राम दामोधर शेंन्डे चरण बारसागडे प्रेमदास रामटेके रमेश डोंगरे नरेंद्र शेंन्डे चोखोबा ढवळे खुशाल चौधरी देवाजी भैसारे सुरेश मेश्राम मुरलीधर



 मेश्राम माया मेश्राम अमिता भैसारे सत्यभामा कोटांगले सुमन उंदिरवाडे सुप्रिया मेश्राम श्याम डोनाडकर योगेश मडावी अरुण भैसारे नाजुक भैसारे रमेश गजभिये जैराम उंदिरवाडे शेवंता जांभुळकर लिला वाकडे वाजुदा शेख माया मेश्राम ज्योती मेश्राम रजणी खैरे देवलाबाई शेंन्डे रघुनाथ बाबनवाडे केशव गणविर राजु दुर्याधन आदि सहीत बामसेफ आरपीआय चे बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments