उमानूरमध्ये धान उघड्यावर;शेतकऱ्यांच्या धानाला न्याय मिळालाच पाहिजे!डॉ. अजयभाऊ कंकडालवार यांची धडक पाहणी,अधिकाऱ्यांना कडक इशारा.

विदर्भ दखल न्यूज 
संपादक मुनिश्वर बोरकर
 गडचिरोली



अहेरी -
अहेरी तालुक्यातील उमानूर येथील धान खरेदी केंद्रावर हजारो क्विंटल धान उघड्यावर पडून असल्याचे गंभीर वास्तव समोर आले असुन उघड्यावर पडलेल्या धानावर गुरेढोरे व रात्रौ डुकरे ताव मारीत असुन.शेतकऱ्यांनी कष्टाने पिकवलेले धान पावसात-उन्हात खराब होण्याच्या मार्गावर असताना प्रशासन मात्र निष्क्रिय असल्याची भावना जनतेत तीव्र झाली आहे.ही बाब कळताच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव तथा माजी जि.प.अध्यक्ष डॉ.अजयभाऊ कंकडालवार यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देत परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली.शेतकरी बांधवांशी थेट संवाद साधत त्यांनी त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि अधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दांत सांगितले *“शेतकऱ्यांचा घाम वाया जाऊ देणार नाही; धान त्वरित उचललेच पाहिजे!”* यावेळी त्यांनी टी.डी.सी.अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून खरेदी प्रक्रिया सुरळीत करण्याचे आणि प्रलंबित धानाची तातडीने उचल करण्याचे कडक निर्देश दिले. “प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे जर शेतकऱ्यांचे नुकसान झाले, तर त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांवर राहील,” असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला.

अजयभाऊंच्या या धडक भूमिकेमुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. स्थानिक पदाधिकारी,माजी सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उमानूरमधील शेतकऱ्यांच्या न्यायासाठी सुरू झालेला हा लढा शेवटपर्यंत लढण्याचा निर्धार अजयभाऊंनी व्यक्त केला.

0/Post a Comment/Comments